Breaking News

शिवसेनेचे पदाधिकारी व भूमि अभिलेख उपअधिक्षक भारत गवई यांच्यामध्ये प्रलंबित घरकुल लाभार्थी समस्ये विषयी चर्चा

तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव

राळेगाव:-राळेगाव शहरातील गेली पाच वर्षांपासून घरकुल लाभार्थींना त्यांच्या जागेचे पट्टे देण्याबाबत प्रशासन दिरंगाई करीत आहे, यासाठी आंदोलन मोर्चे सुद्धा काढण्यात आले होते कित्येक दिवसापासून लाभार्थी हे ताटकळत असून त्यांना लाभ घेता येईना. काही दिवसाआधी भूमी अभिलेखचे अधिकारी शिवाजी नगर येथे मोजणी करण्यासाठी आले होते दोन दिवसा नंतर मशीन बंद पडली तेव्हा पासून मोजणी करण्यासाठी आलेच नाही असे नागरिकांकडून ऐकण्यात येत आहे.

शहरातील बऱ्याच प्रभागा मध्ये अजूनपर्यंत जागेचे पट्टे मिळाले नसून नवीन कुटुंब घरकुला पासून वंचित राहत आहे. अनेकांनी याचा पाठपुरावा करून सुद्धा हि कामे निकाली लागली नसून येथील अधिकारी चालढकाल पणा करीत आहे, त्याबाबत जाब विचारण्यासाठी आज शिवसेनेचे शिष्टमंडळ भुमि अभिलेख कार्यालय येथे उप अधिक्षक भारत गवई यांच्याशी घरकुल लाभार्थी यांच्या जागेची त्वरित मोजणी करुन पट्टे वाटप करण्यासंदर्भात प्रदिर्घ चर्चा करण्यात आली तसेच नगर पंचायत कडे चार लाख सत्ताविस हजार रुपये बाकी असून दोन लाख भरण्यात आले आहे.

तरी लवकरच मोजमाप करण्यास सुरुवात केल्या जातील अशे सांगण्यात आले, तांत्रिक अडचण व अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे दिरंगाई झाली असे गवई यांनी सांगितले लवकरच प्रकरण मार्गी लावुन सहकार्य करण्याचे अभिवचन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले त्यावेळी उपस्थितीमध्ये शिवसेना तालुका प्रमुख विनोद भाऊ काकडे, शहर प्रमुख राकेश भाऊ राऊळकर ,शिवसेना शहर संघटक इमरान पठाण, व्यापारी आघाडीचे शहर प्रमुख सुनिल क्षिरसागर, जेष्ठ शिवसैनिक शंकर भाऊ गायधने यांची उपस्थिती होती.गोरगरीब जनतेच्या समस्या जाणून घेऊन शासनाकाडे त्याचा पाठपुरावा करून जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )चे कार्यकर्ते व पदाधिकारी सातत्याने जनतेच्या पाठीशी उभे राहतात अशी तालुक्यातील जनतेमध्ये चर्चा होताना दिसत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved