तालुका प्रतिनीधी-शशिम कांबळे राळेगाव
राळेगाव:-सोमवार दिनांक १०/०७/२०२३ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष मा संतोषजी निकम सर यांच्या आदेशनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील सरांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण राज्यात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याच्यां आव्हानाचे पालन करून यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांनी जिल्हातील पत्रकार संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यांच्या उपस्थतीमध्ये आज रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना,

पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार अश्या अनेक पत्रकारांच्या समस्या व (प्रश्न) ? शासन दरबारी सोडविण्यासाठी तसेच पत्रकारांना शासन व प्रशासचे अधिकारी यांच्या कडून पत्रकारांवरती ३५३ सारखे खोट्या गुन्ह्यात अडकावून दपडशाहीचे राजकारण करुन पत्रकरांनच आवाज दाबाण्याच काम दिवसाने दिवस मोठे प्रमाण वाढले आहेत त्यांमुळे शासनाने तात्काळ दाखल घेवून पत्रकारांवरती दाखल करण्यात आलेला ३५३ चा गुन्हा ताबडतोब गृहमंत्रालयाला आदेश पारित करुन गुन्हा रद्द करण्यात यावे.
अश्या अनेक मागण्याचे निवेदन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख प्रफुल्लभाऊ मेश्राम यवतमाळ, जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे., के के चव्हाण जिल्हा संपर्क प्रमुख, धर्मपाल माने जिल्हा प्रसिध्दी प्रमूख, डि के हणवते, उपाध्यक्ष, अशोकराव पडोळे जिल्हाध्यक्ष शेतकरी संघ,संजय शेळके बाभूळगाव तालुकाध्यक्ष कामगार संघ, फिरोज खा पठाण तालुकाध्यक्ष मोटर वाहन चालक मालक बाभुळगाव, विनोद माहुरे तालुकाध्यक्ष ,अजय जुगनाके सह सचिव राळेगाव, राजेश बोरुंदिया जिल्हा संघटक, सुधाकर पाटील विदर्भ संघटक ,नरेंद्र थूल जिल्हा संघटक, जितेन्द्र काळपांडे ,प्रदीप आंबटकर, नितीन मेश्राम या सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे शासनाला पत्रकारांनची अनेक मागण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले.
ज्वाला समाचार सच का सामना