Breaking News

बांबू प्रशिक्षणातून घुग्घुसच्या महिलांना मिळणार रोजगाराची नवी दिशा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 23 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) चिचपल्लीच्या वतीने आणि संचालक मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्घुस येथे आयोजित 15 दिवसीय बांबू प्रशिक्षण कार्यक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे संपन्न झाला. ‘कॅम्प सन 2025-26 अंतर्गत ग्रामीण महिलांच्या हस्तकौशल्याला आधुनिक जोड देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक विवेक बोढे, नगरसेविका चैताली सातपुते, वैशाली ढवस आणि प्रयाग सखी मंचच्या किरण बोढे उपस्थित होत्या.

सुरवातीला मान्यवरांनी प्रशिक्षणार्थी महिलांनी तयार केलेल्या आकर्षक बांबू वस्तूंची पाहणी केली. महिलांनी अत्यंत कमी वेळात आत्मसात केलेले कौशल्य पाहून मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले.बीआरटीसीचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार यांनी केंद्राच्या विविध योजनांची माहिती देताना सांगितले की, प्रशिक्षणार्थी महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सदैव कटिबद्ध राहील.

नगरसेवक बोढे म्हणाले, घुग्घुस नगर परिषद आणि बीआरटीसीच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी लवकरच घुग्घुस येथे ‘बांबू वस्तू विक्री मार्ट’ उभारण्यात येईल. या माध्यमातून परिसरातील सुमारे 200 महिलांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध होईल. या ‘ट्रेनिंग कम प्रोडक्शन’ उपक्रमात घुग्घुस येथील एकूण 28 महिला सहभागी झाल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षण सत्र संचालक तथा पर्यवेक्षिका योगिता साठवणे यांनी केले. संचालन व आभार सुनिता मोकाशे यांनी मानले. बांबूपासून तयार केलेल्या कलात्मक वस्तूंना बाजारपेठ मिळवून देऊन महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved