Breaking News

वरवट येथे 15 दिवसीय बांबू हस्तकला प्रशिक्षण शिबिराचा समारोप

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली च्यावतीने ‘कॅम्पा’ अंतर्गत वरवट येथे आयोजित करण्यात आलेल्या 15 दिवसीय ‘पारंपारिक बांबू हस्तकला समुदाय सक्षमीकरण’ प्रशिक्षण शिबिराचा नुकताच समारोप झाला. या प्रशिक्षणाद्वारे स्थानिक महिलांना आधुनिक बांबू कलाकृतींचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.15 दिवसांच्या कालावधीत प्रशिक्षणार्थी महिलांनी अत्यंत उत्साहाने बांबूपासून विविध आकर्षक वस्तू तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले. यामध्ये प्रामुख्याने बांबू बुके (गुच्छ), बांबूची फुले, बांबू बॅच आणि बांबू चटई यांसारख्या वस्तूंचा समावेश होता. घरची सर्व कामे सांभाळून महिलांना हा व्यवसाय करता यावा आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश मल्लेलवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे कौतुक करत, त्यांना भविष्यात मार्केटिंग आणि रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी पर्यवेक्षक योगिता साठवणे, वन कर्मचारी कृष्णा साहू यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी मनिषा नन्नावरे आणि संतोष बजाईत यांनी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली. त्यांनी महिलांना बांबू कापण्यापासून ते फिनिशिंगपर्यंतचे सर्व बारकावे शिकवले. कार्यक्रमाचे संचालन समन्वयक सुनीता मोकाशे यांनी केले. या प्रशिक्षणामुळे वरवट परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आता त्या घरबसल्या बांबू व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved