Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
*जय भवानी जय शिवाजी या जय घोषणांनी चिमूर नगरी दुमदुमली*
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :– रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चिमूर यांच्या वतीने शहरातून शिवशोभायात्रा काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण करत “जय भवानी,जय शिवाजी” या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.

कार्यक्रमाची सुरुवात उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ.अश्विन अगडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी मुख्याध्यापक निशिकांत मेहरकुरे, परमानंद बोरकर, माजी विद्यार्थी श्रीहरी सातपुते, भारती गोडे आदी उपस्थित होते.

नेहरू विद्यालय ईथुन शोभायात्राची सुरूवात झाली, मुख्य मार्गाने शोभायात्रा नेहरू चौक, डॉ.अब्दुल कलाम चौक,मासळ रोड गुरुदेव किराणा चौक, संताजी जगनाडे महाराज चौक आणि दुकान लाईन मार्केट रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने काढण्यात आली. नागरिकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. व्यापारी संघटनेतर्फे अल्पोपहाराची तर माजी विद्यार्थ्यांकडून पाणी व मिठाईची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धोपटे मैडम, उमरे मॅडम,वागदरे सर,दांडेकर सर,गोमासे सर,गौरकर सर,चौधरी सर,सहारे सर,मेश्राम सर,शेंडे सर व विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
ज्वाला समाचार सच का सामना