Breaking News

वनोजा ग्रामपंचायतचा कारभार चव्हाट्यावर

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* तहकुब ग्रामसभेत विषय सुचीत विषय नसतांना उपसरपंच आणि सचिवाची मनमानी *

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे 

राळेगाव :- तालुक्यातील वनोजा ग्रामपंचायत मध्ये २६ जानेवारी रोजी ग्रामसभा आयोजित केली होती तरी ग्रामस्थांची उपस्थिती कमी असल्याने सभा रद्द करण्यात आली तरी तहकुब सभा सदर आठव्या दिवशी दि.०३-०२-२६ रोजी घेण्यात आली तरी शिपाई पदाचा विषय सुचीत विषय नसताना सचिवाच्या मनमानी कारभारामुळे काही दिवसांपूर्वी आलेल्या अर्जाचे वाचन करून तहकुब ग्रामसभेत गोंधळ उडाला सरपंचावर दबाव आणून प्रश्नावर प्रश्न विचारून सरपंचाला गोंधळून टाकले आणि नंतर सरपंचा तहकुब ग्रामसभेतून थेट घरी गेल्या त्यात सचिव आणि उपसरपंच यांच्या मनमानी कारभारामुळे शिपायाला अस्थायी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला यात काही अर्जदारांच्या तक्रारीना उपसरपंच व सचिवाच्या मनमानीमुळे पाठ दाखविण्यात यश आले.

सरपंचांनी दि.११-१०-२०२४ रोजी शिपाई पदाकरीता काही निवडक अर्जामधुन रोजंदारी तत्वावर शिपाई पदाची नियुक्त करण्यात आली होती. नियुक्ती ही अपारदर्शक पद्धतीने केली यात गावातील १२ ग्रामस्थांनी अर्ज प्राप्त केले यात निवड ही ईश्वर चिट्ठीद्वारे करण्यात आली पण १२ अर्जादाराला नोटीस दिल्या नाही आणि फोन करून सुद्धा कळविण्यात आले नाही,नेमकं यात एका अर्जदाराला बोलावून त्यात त्यांच अर्जदाराची निवड होते यात कारण काय?

ग्रामपंचायतने विडीओ वायरल केला त्यात विडीओ पण अपूर्ण व्हायरल केला त्यात प्रक्रिया अशी आहे की त्या विडीओमध्ये ज्या अर्जदाराचे नाव निघते तोच अर्जदार अचानक त्याच वेळी ग्रामपंचायत गेटमधून आत प्रवेश करतो आणि त्याच वेळी अर्जदाराचे स्वागत करतो यात समस्त ग्रामस्थाच्या मनात पूर्ण चिट्यांमध्ये त्याच अर्जदाराचे नांव लिहिले असेल तर कोणाला माहीत? कारण चिट्ठी काढतांनाचा विडीओ वायरल केला आणि कोणती नावे लिहली तो विडीओ आणि त्या सभेत कोण हजर होते तो विडीओ वायरल नाही केला यात कारण काय? असा प्रश्न ग्रामस्थांच्या मनात होतांना दिसून येत आहे नेमकं काळाबाजार तर नाही असा गावातील जनतेच्या मनात विविध प्रश्न येताना दिसून येत आहे.

की चिट्ठी निघायच्या आधी कुठेतरी पाणी मुरल्या सारखे झाले असे ग्रामवासीयांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत आहे,यात असे सिद्ध होत आहे की काहीतरी साटेलोटे असल्यासारखे दिसून येत आहे त्या पदाचा कार्यकाळ पुर्ण झाला असुन अद्यापही ११ महिण्याकरीता नियुक्त करण्यात आलेल्या शिपायास ८ दिवसांचा खंड देऊन शिपायाला आणखी कामावर रूजू केले यात काही ग्रामस्थांनी तक्रारी करून अद्यापही सरपंच सचिव यांनी कार्यवाही केली नाही,तात्पुरत्या रोजंदारी शिपायाला खारीज करून ते पद रिक्त करून पुन्हा नविन भरती घ्यावी आणि पात्र अर्जामधुन लाभार्थ्याची शिपाई पदाकरीता अस्थायी निवड करण्यात यावी असे गावातील ग्रामस्थांचे चर्चेतून समोर येत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved