Breaking News

चिमूरात रंगणार “चिमूर घोडायात्रा महोत्सव”

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* 2 फेब्रुवारी पासून प्रसिद्ध गायक आदित्य नारायण, मैथिली ठाकूर, पलक मुच्छल यांच्या कार्यक्रम आयोजित *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूरात जगप्रसिध्द घोडा यात्रा दरवर्षी हजारोंच्या उपस्थितीत भरत असते. हि यात्रा प्रसिद्ध असून, चिमूर चा घोडा ब्रम्हपुरी चा वडा अशी ” म्हण प्रचलित आहे. मागील काही वर्षापासुन चिमूर घोडा यात्रा नव्या दमाने भरत आहे. मागील अनेक वर्षात सतत कुठल्या ना कुठल्या मंदिराच्या प्रतिकृतीचे हुबेहूब मंदिर बांबू पासुन बनवून भाविकांना दर्शन मिळत होते. मात्र मागील तीन वर्षांपासून काही आगळीवेगळी कृती करुन चिमूर क्रांती भूमीतील जगप्रसिद्ध घोडा यात्रा ची महती जगाच्या कानाकोपऱ्यात गेली पाहिजे असा अचंबा मनाशी बाळगून भांगडिया फाऊंडेशन तर्फे आमदार बंटी भांगडिया व चिमूर घोडा यात्रा उत्सव समिती चिमूर तर्फे सतत ४ दिवस भव्य दिव्य असा कार्यक्रम चिमूर क्रांती भूमीत यावर्षी रंगणार आहे.

श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा चिमूर निमित्त “चिमूर घोडा यात्रा महोत्सव” २०२६ असा असणार असुन, सदर घोडा यात्रा महोत्सवाला दि. 2 फरवरी रोजी प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल,3 फेब्रुवारी प्रसिद्ध गायिका तसेच बिहार च्या आमदार मैथिली ठाकूर यांचा कार्यक्रम,4 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध बॉलिवूड गायक आदित्य नारायण यांचा यांचा बहारदार कार्यक्रम चिमूर क्रांती भूमीत यावर्षी रंगणार असून 5 फेब्रुवारी रोजी डान्स कॉम्पिटिशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाला १५ हजार लोकांना बसण्याची व्यवस्थित व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रम भव्य दिव्य असा कार्यक्रम चिमूर क्रांती भूमीत होत असून या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी शांततेत मनमुराद आनंद लुटवा या कार्यक्रम प्रसंगी पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तरी चिमूर विधानसभा क्षेत्रांतील नागरीकांना शांततेत कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन आपलाच कार्यक्रम समजून सहकार्य करण्याचे आवाहन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया तसेच चिमूर घोडा यात्रा उत्सव समिती चिमूर यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved