Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
* बोलेरो कॅम्पर वाहन व डिझेल साठयासह ९,९१,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/चिमूर :- आज दिनांक १६/०१/२०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत अवैधरीत्या साठवून ठेवलेला डिझेलचा साठा पकडण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कॅम्प नं. १७ सास्ती येथे बोलेरो कॅम्पर क्र.एम.एच.३४-बीझेड-८६६५ चा फरार चालक व त्याचे इतर २, ३ साथीदार इसम याने कोणतीही परवानगी नसताना एकूण १०२० लिटर डिझेल लोकांचे जीवितास धोका होईल अशा निष्काळजीपणे व पुरेसा बंदोबस्त न करता अवैध रित्या साठा करून ठेवल्याचे आढळून आले. सदर ठिकाणी पंचनामा करून अंदाजे किं. ९,९१,८००/- रुपये किमतीचा डिझेल साठा व साठवणुकीसाठी वापरलेली बोलेरो गाडी, प्लास्टिक ड्रम, प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन-पोलीस अधीक्षक, चंद्रपूर व ईश्वर कातकडे-अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर व सुधीर नंदनवार-उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांचे नेतृत्त्वाखाली गुन्हे शोध पथक इन्चार्ज पोउपनि दिपक ठाकरे, पोउपनि पराग उल्लेवार, सफौ किशोर तुमराम, पोहवा पुंडलिक परचाके, विक्की निर्वाण, महेश बोलगोडवार, मिलिंद जांभूळे, शफीक शेख यांनी केली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना