Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
* भव्य रक्तदान शिबीर व मार्गदर्शन *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- महाराष्ट्र शासनाने ०२ जानेवारी हा महाराष्ट्र पोलीसांचा स्थापना दिवस म्हणुन मान्यता दिली असुन, त्यानुसार संपुर्ण महाराष्ट्र राज्यात ०२ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो. दि. ०२ जानेवारी ते ०७ जानेवारी पर्यंत संपुर्ण सप्ताहात महाराष्ट्र राज्यातील पोलीस स्टेशन/शाखा/दुरक्षेत्र तर्फे पोलीस स्थापना दिवसानिमीत्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन, स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

तसेच नागरीकांमध्ये जनजागृती होईल असे कार्यक्रम आयोजित करुन, मार्गदर्शन करुन पोलीस स्थापना दिवसानिमीत्य (रायझिंग डे साजरा करण्यात येतो. यावर्षी सुद्धा पोलीस स्टेशन भिसी तर्फे पोलीस स्थापना दिवसाचे औचीत्य साधुन भिसी पोलीसांनी पोलीस स्टेशन भिसी तर्फे दि. ०५/०१/२०२६ रोजी पोलीस स्टेशन भिसी चे परीसरात शाळकरी मुलांकरीता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊन, त्यांना प्रथम, व्दितिय व तृतिय पारीतोषिक देण्यात आले. व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. तसेच त्यांना गुड टच, बँड टच बाबत, सायबर क्राईम, वाहतुकीचे नियम व सुरक्षा, याबाबत माहीती देण्यात आली.

आज दिनांक ०६/०१/२०२६ रोजी पोलीस स्टेशन आवारात जिवनज्योती ब्लेंड बैंक नागपुर यांचेकडुन रक्तदान शिबिराचे आयोजन करुन, पोलीस स्टेशनचे अधिकारी/अंमलदार, पोलीस पाटील, होमगार्ड व नागरीकांनी रक्तदान करुन पोलीस स्थापना दिवस साजरा करण्यात महत्वाचा वाटा उचलला. पोलीस पाटील, होमगार्ड, व नागरीकांना पो.स्टे. चे कामकाज, सायबर गुन्हे, नविन अंमलात आलेले कायदे, वाहतुक नियम व सुरक्षा, लैंगिक अत्याचार संबंधी गुन्हे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पो.स्टे. हद्दीत गहाळ झालेले एकुण ११ मोबाईल फोन चा शोध घेऊन ११ मोबाईल मुळ मालकांचे स्वाधिन करण्यात आले. भिसी पोलीसांनी पोलीस स्थापना दिवसानिमीत्य (रायझिंग डे) राबविलेल्या स्पर्धा, जनजागृती, मार्गदर्शन बद्दल पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीकांनी पोलीसांचे आभार मानले.

पोलीस अधिक्षक चंद्रपुर मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक, ईश्वर कातकडे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर दिनकर ठोसरे सा. यांचे मार्गदर्शनात ठाणेदार मंगेश भोंगाडे, पोउपनि रविंद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, व पो.स्टे. भिसी चे अंमलदार यांनी पोलीस स्थापना दिवस ( रायझिंग डे) यशस्वीरित्या साजरा करण्यात मोलाची भुमिका बजावली.
ज्वाला समाचार सच का सामना