Breaking News

नागपूर महानगरपालिका – झोन स्तरावर होणार मतमोजणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* आयुक्तांनी राजकीय पक्षांच्या बैठकीत दिली माहिती *

विशेष प्रतिनिधी – नागपूर 

नागपूर, ता. ०५: नागपूर महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात माहिती देण्यासाठी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक मनपा मुख्यालय येथे पार पडली. या बैठकीत राजकीय पक्षांना विविध निवडणूक विषयांबाबत माहिती देण्यात आली. मतमोजणी झोन निहाय १० ठिकाणी होणार आहे. या निवडणुकीत ९९३ उमेदवार रिंगणात उभे असून मनपातर्फे पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी संपूर्ण तयारी झालेली आहे.

या बैठकीत मनपा उपायुक्त (निवडणूक) निर्भय जैन आणि विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित होते.जैन यांनी मतदान साहित्य वितरण, स्ट्रॉंग रूम, आणि मतमोजणी स्थळ बद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३००४ मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्राची माहिती मनपाच्या वेबसाईट वर देण्यात आली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची माहिती देखील वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. उमेदवारांच्या खर्चाची माहिती झोन स्तरावर संकलन व तपासणी साठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

उमेदवारांना खर्चाचे विविध नमुने , माहिती सादर करण्याची पद्धती याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच विविध परवानगी साठी झोन स्तरावर आणि मुख्यालय येथे एक खिडकी व्यवस्था उभारण्यात आली आहे. झोन स्तरावर आचार संहिता कक्षाची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आली असून दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअर उपलब्ध राहणार आहे. मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता मनपा तर्फे स्वीप उपक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या विविध टप्प्यात सहकार्य करून सदर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पडून यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.

झोन निहाय माहिती

मनपा झोन

“मतमोजणी ठिकाणाचे नाव”

लक्ष्मीनगर झोन – गंगाधर फडणवीस क्रीडा संकुल, विवेकानंद नगर,

धरमपेठ झोन – सेंट फ्रान्सिस दि सेल्स ( एस.एफ.एस) कॉलेज, सेमिनरी हिल्स,

हनुमाननगर झोन -ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, क्रीडा चौक,

धंतोली झोन – सामुदायिक भवन, रेल्वे विभाग, अजनी रोड, गुलमोहर कॉलनी, वंजारी नगर,

नेहरुनगर झोन – राजीव गांधी सभागृह, न्यू नंदनवन, पाण्याच्या टाकीजवळ,

गांधीबाग झोन – नागपूर सुधार प्रन्यास कर्मचारी सांस्कृतिक सभागृह, ग्रेट नाग रोड, गणेशनगर,

सतरंजीपुरा झोन – दि नागपूर टिम्बर मर्चंट असोसिएशन लकडगंज

लकडगंज झोन – विनायकराव देशमुख हायस्कूल आणि विज्ञान कनिष्ट महाविद्यालय ऐव्हीजी लेआऊट, लकडगंज,

आशीनगर झोन -डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, ललित कला भवन, ठवरे कॉलनी

मंगळवारी झोन – अन्नासाहेब गुंडेवार महाविद्यालय (तिडके विद्यालय परिसर) काटोल रोड, छावणी.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved