Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- नागभिड तालुक्यातील ३६ वर्षीय इसमाने सावकाराकडुन व्याजाने घेतलेल्या पैश्याची परतफेड भरण्याकरीता वेगवेगळया सावकारांकडुन व्याजाने पैसे घेवुन अद्यापपावेतो मोठया प्रमाणावर व्याजाची रक्कम दिल्यासंदर्भात केलेल्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे दाखल अपराध क्रमांक ६५४/२०२५ कलम ३८७, ३४२, २९४, ५०६, १२० (ब), ३२६ भादंवि आणि कलम ३९, ४४ महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ या गुन्हयाचे तपासात आजपावेतो ५ आरोपी अटक करण्यात आले असुन फिर्यादी यांनी इतर देशात जावुन किडनी ट्रॉन्सप्लंट केल्या संदर्भात सुध्दा तपास सुरु आहे.
चंद्रपूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे जर कोणी अवैध सावकार आपल्या कडुन मुद्दलाचे पैश्या पोटी अव्वाचे सव्वा व्याज आकारुन आपली व कुटूंबियांची आर्थीक, शारिरीक व मानसिक छळवणुक करुन शोषण करीत असेल तर चंद्रपूर जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाचे 112 किंवा 7887890100 यावर माहिती दयावी. आपले नांव गोपनिय ठेवण्यात येईल तसेच अवैध सावकारांविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ज्वाला समाचार सच का सामना