Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in
*पोलीस स्टेशन भद्रावती ची धडक कारवाई*
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- आज दिनांक २६/११/२०२५ रोजी भद्रावती पोलीसांना मिळालेल्या गोपनिय व खात्रीशिर माहिती वरुन सुमठाणा चौक भद्रावती येथे एक व्यक्ती नागरीकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अवैधरित्या तलवार बाळगुन आहे. या माहितीवरुन पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहचली व आरोपी प्रज्वल अशोक कोडापे वय २२ वर्ष रा. शिवाजी नगर भद्रावती यास ताब्यात घेवुन त्याचे जवळुन एक धारदार लोखंडी तलवार किं. अं. १०००/- रु. चा प्राणघातक हत्यार जप्त केले.
पोलीस स्टेशन भद्रावती येथे त्याचेविरुध्द कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, संतोष बाकल, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे भद्रावती ठाणेदार पोनि श्री योगेश्वर पारधी यांचे नेतृत्वात पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, पोअं. गोपाल आतकुलवार, जगदीश झाडे, अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुदरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे, रोहीत चिटगिरे, संतोष राठोड यांनी केली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना