Breaking News

पोलिसांनी २ आरोपीला अटक करून ९,२५,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in

* महाराष्ट्र-तेलंगणा राज्य सिमेवर नाकाबंदी करुन ७ गौवंशीय जनावरांची केली सुटका *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी विरुर पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली असता महाराष्ट्र – तेलंगणा राज्य सिमेवरील मौजा अंतरगाव वन तपासणी नाका येथे नाकाबंदी करुन एक महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क. MH34-BZ-7691 थांबवून त्यातील एकुण ०७ गौवंशीय जनावरांची सुटका केली. सदरच्या ०७गौवंशीय जनावरे वाहतुक करणारे आरोपी नामे शेख शाहरुख शेख मेहबुब वय ३१ वर्ष (२) सोहेल अहमद शेख हुसेन वय २९ वर्ष दोन्ही रा. मौलाना आझाद वार्ड बल्लारपुर यांना ताब्यात घेवुन नमुद कारवाई दरम्यान गोवंशीय जनावरे ०७ नग किं.अं. १,७५,०००/- रु. आणि गुन्हयात वापरलेला वाहन किं. अं.७,५०,०००/- रु. असा एकुण ९,२५,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला.

आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन विरुर येथे अपराध क्रमांक १८५/२०२५ कलम ५ (ब), ९,११ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ सहकलम ११(१) (सी) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास विरुर पोलीस करीत आहे.

पोलीस अधीक्षक, ईश्वर कातकडे-उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा पुढील कारवाई मुम्मका सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक, सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संतोष वाकडे, पोहवा /अफसर पठाण, पोअं./विभीषण खटके, पोअं. / भुषण इटनकर, पोअं. / राहुल वैद्य, पोअं./अविनाश बोरुले सर्व पोलीस स्टेशन विरुर यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved