Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in
* मोटारसायकल सहित 2,75,500 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- आज दिनांक 23/11/2025 रोजी पोलीस स्टेशन नागभीड अंतर्गत पेंढरी रेंगातुर शेतशिवारातील नाल्याजवळ अवैधरित्या कोंबडा बाजार चालु असल्याची गोपनिय माहीती मिळाली. त्याआधारे सुरू असलेल्या अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकली असता आरोपी नामे जाबीर हयादखॉ पठाण वय 33 वर्षे रा.नागभीड,रोशन यादव देव्हारे वय 36 वर्षे रा. नवखळा, खुशाल उर्फ सचिन गणेश नान्हे वय 30 वर्षे रा. नवखळा, संजय रामदास माथनकर वय 44 वर्षे रा.नवखळा,निखील रविंद्र समर्थ वय 25 वर्षे रा.नवखळा सर्व नागभीड तालुका,जिल्हा चंद्रपुर येथील आहे.
पोलिसांनी आरोपी सहित तीन जखमी कोंबडे किंमत 900/- रूपये व दोन लोखंडी धारदार कात्या व दोऱ्या किंमत 500/-रूपये तसेच आरोपी क्रं.01 ते 05 यांचे अंगझडतीत /- 3500 रूपये, कोंबडा बाजार अड्डुड्यावर नगदी 600/-रूपये,07 मोटारसायकल किंमत 2,70,000/-रूपये असा एकुण 2,75,500/- रूपयेचा मुद्देमाल कोंबडयाचे पायाला धारदार कात्या बांधुन कोंबडयाची झुंज लावुन त्यावर पैशाची बाजी लावुन हारजितचा जुगाराचा खेळ खेळताना मिळुन आल्याने नमुद 05 आरोपी विरूध्द महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमान्वये कार्यवाही करण्यात आली.
पुढील कार्यवाही मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी रमाकांत कोकाटे, पोलीस निरीक्षक पो.स्टे. नागभीड यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनि. अजिंक्य गोविंदलवार, पोहवा/1140 नरेश वाढई, पो.अं./1971 दिलीप चौधरी, पो.अं./1479 भरत घोळवे, पो.अं./1317 प्रफुल रोहनकर यांचे पथकाने केली.
ज्वाला समाचार सच का सामना