Breaking News

गांजा विक्री कराणाऱ्यावर पोलीसांची धडक कार्यवाही

Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in

*दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन 2 किलो 11 ग्रॅम गांजा केला जप्त*

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- आज दिनांक 13/11/2025 रोजी गडचांदूर पोलीसांना गोपनिय माहिती मिळाली की, नामे (1) ईरफान सय्यद ईस्माईल रा. लक्ष्मी टॉकीज जवळ गडचांदुर व (2) अनिल जगेराव आडे रा. बैलमपुर हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता आणलेला असुन वरझडी शेतशिवारात गांजा विक्री करीत आहे.

अशी माहिती मिळाली वरून सदर खबरेची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी कदम सा. यांना देवुन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सा. गडचांदुर यांच्या परवानगीने मुखबीरचे खबरेप्रमाणे बैलमपुर मार्ग वरझडी शेतशिवारात जावुन तिथे रोडचे आडोश्याला वाहने थांबवुन तेथील पायदळ कॅनलचे बाजुला गेलो असता तिथे झाडाखाली दोन ईसम थांबलेले दिसुन आले त्यांच्ये जवळ जावुन त्यांना तिथे उभे राहण्याचे कारण विचारले असता कोणतेही समर्पक उत्तर दिले नाही. त्यांना पोलीस स्टाप व पंचाची ओळख देवुन त्यांची व आजुबाजुचे परीसराची पंचासमक्ष झडती घेतली असता शेताचे बांधावर झाडाखाली एक पोपटी रंगाचे गाठोडे दिसुन आले.

सदर गाठोड्याची पाहणी केली असता त्यात हिरवट रंगाचा ओलसर पाने, फुल व बोंडे अश्या वर्णनाचा दिसला. पंचांना त्याचा वास दिला असता पंचांनी वास घेवुन तो गांजा असल्याचे सांगीतले. सदर पोपटी रंगाचे गाठोड्या मध्ये हिरवट रंगाचा पाने, फुले व बोंडे असलेल्या गाजा सदृश्य अंमली पदार्थाची पंचासमक्ष वनज केले असता त्याचे एकुण वनज 2 किलो 11 ग्रॅम इतके मिळुन आल्याने सदर ईसमावर गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनीयम सन 1985 चे कलम 8 (क).20 (ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.

पुढील कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन सा.,अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र जाधव उपविभाग गडचांदूर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गडचांदूर येथील पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, यांचे नेतृत्वात पोउपनि पंकज हेकाड, डि.बी. पथकातील पोहवा-शितल बोरकर, नापोअ / बलवंत शर्मा, पोअं. प्रकाश बाजगीर, सुरज ढोले, मनोहर जाधव, साईनाथ उपरे नी केली असुन पुढील तपास सुरू आहे.औ

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved