Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in
* चंद्रपूरचे जितेंद्र ध. जोगड ठरले राज्यातील मानकरी पत्रकार *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेतर्फे दरवर्षी प्रदान करण्यात येणारे राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष पदाधिकारी पुरस्कार २०२५ जाहीर झाले असून, यामध्ये चंद्रपूर जिल्हा साप्ताहिक विंगचे अध्यक्ष मा. श्री. जितेंद्र ध. जोगड यांची साप्ताहिक विंगच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
या निवडीची घोषणा संघटनेचे मुख्य संयोजक तथा संचालक गोरक्षनाथ मदने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही ५६ देशांमध्ये कार्यरत, तब्बल ४ लाख ७० हजार पत्रकार सदस्यसंख्या असलेली जगातील क्रमांक एक आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून, पत्रकारांच्या सामाजिक, व्यावसायिक आणि वैचारिक विकासासाठी कार्यरत आहे.
संघटनेचे राज्य शिखर अधिवेशन दि. १५ व १६ नोव्हेंबर २०२५ रोजी पंढरपूर येथील इस्कॉन सभागृहात होणार असून, या अधिवेशनात निवड झालेल्या सर्व मान्यवर पत्रकारांचा सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते केला जाणार आहे.
निवड प्रक्रियेत संघटनेतील विविध विभागातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व विंग पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा व पत्रकारितेतील योगदानाचा विचार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष श्रेणीत — व्यंकटेश धुडूमवार (गडचिरोली), राजेश भालेराव (जालना), रमाकांत पाटील (नंदुरबार), अनिल करंदकर (सातारा), मंगल डोंगरे (ठाणे), रुपेश पाटील (सिंधुदुर्ग) यांची निवड झाली असून,
तालुकाध्यक्ष श्रेणीत — राजू कापसे (रामटेक), गंगाधर ढवळे (नायगाव), उमेश काटे (अमळनेर), गणेश आवळे (मिरज), भारत म्हात्रे (वसई) यांची निवड करण्यात आली आहे.
विभागनिहाय विंग पुरस्कारांमध्ये —
महिला विंग : लक्ष्मी वाडेकर (बुलढाणा)
साप्ताहिक विंग : जितेंद्र जोगड (चंद्रपूर)
रेडिओ विंग : अनुप फुसके (सातारा)
डिजिटल विंग : वसंत खडसे (वाशीम)
यांचा समावेश आहे.
या निवड प्रक्रियेत अजित कुंकुलोळ, कुमार कडलग, नरेंद्र देशमुख, अमोल मतकर, मिलिंद टोके, बापूराव पाटील, किशोर करंजेकर, वैशाली पाटील, रश्मी मारवाडी व किरण ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, महासचिव दिगंबर महाले, कार्याध्यक्ष विजय चोरडिया, मंगेश खाटीक, महिला विंग प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, रेडिओ विंग प्रदेशाध्यक्ष इर्षाद शेख, साप्ताहिक विंग प्रदेशाध्यक्ष वामन पाठक आणि अब्दुल कईम यांनी जितेंद्र जोगड यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेच्या कार्याचे कौतुक करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले
ज्वाला समाचार सच का सामना