Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आज दिनांक 12/11/2025 रोजी चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शंकरपुर भिसी रोडवर क्रिकेट ग्राउंडच्या बाजूला 2 कि.मी.पुर्वस वेळ दुपारी 2:10 वाजताच्या सुमारास ट्रक व ई रिक्षामध्ये धडक होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

फिर्यादी हेमंत घनश्याम मुंगले वय २८ वर्ष रा. भिसी यांने दिलेल्या माहितीनुसार मृतक राहुल ओमराज साठवणे वय 3 1 वर्ष रा. भिसी हा आपल्या मित्राच्या मालवाहू ई रिक्षामध्ये पाण्याच्या कॅन वाहुन भिसी, शंकरपूर रोड ने जात असताना शंकरपूर कडून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच.40 सि.टी 33 91 चा चालक नामे ऋषिकेश मनोहर कोडापे राहणार मोहाडी तालुका नागभीड याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काजीपणे चालवून मृतक यांचे ई रिक्षाला समोरून धडक दिल्याने अपघात झाला. ट्रकच्या धडकेत राहुल ओमराज साठवणे हा गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ उपचारासाठी रूग्णालय दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू झाल्याचे सांगितले.
अशा फिर्यादी यांच्या तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला सदर ट्रक व आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून पुढील कारवाई तपास अधिकारी पी.एस.आय. रवींद्र वाघ व भिसी पोलीस करीत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना