Breaking News

शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघाला अखेर वन विभागाच्या पथकाने केले जेरबंद

Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- चिमूर तालुक्यातील शंकरपूर आणि शिवरा येथील शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या त्या वाघाला वन विभागाच्या पथकाने सोमवारला रात्री ८ वाजता जेरबंद केले.चिमूर वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या शंकरपूर उपवनक्षेत्रातंर्गत मौजा डोमा बीटमध्ये २६ ऑक्टोबरला नीलकंठ भुरे व ०५ नोव्हेंबरला ईश्वर भरडे या दोन शेतकऱ्याला वाघाने ठार केले त्यामुळे मानवी मन संतापयुक्त झाले होते.याचाच एक भाग म्हणून शंकरपूर येथे तब्बल नऊ तास प्रेत ठेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

जोपर्यंत नरभक्ष वाघाचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत प्रेताचा अंत्यविधी केला जाणार नाही अशी भूमिका रस्तारोको आंदोलन करणाऱ्या नागरिकांची होती. नागरिकांच्या संतप्त भुमिका बघता,वनविभागाने तत्परतेने नरभक्ष वाघाला पकडण्यासाठी पाऊले उचलली व ०६ सप्टेंबर पासून त्या वाघाला पकडण्याची मोहीम राबवने सुरू केली होती.त्या नरभक्ष वाघाचा पकडण्यासाठी सहा पाळीव जनावरे बांधण्यात आले होते तर ३५ वनकर्मचारी व मजूर चोवीस तास पाळत ठेऊन होते.अखेर पाच दिवसांच्या प्रयत्नांनतर सोमवारी सकाळी बांधून ठेवलेल्या पाळीव जनावरांना त्या नरभक्ष वाघाने मारले.संध्याकाळी मारलेल्या पाळीव प्राण्यांना खायला वाघ परत आला असता,शिताफीने त्या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद केले.

सदर मोहीम वन विभागाचे पशु वैद्यकीय अधिकारी खोब्रागडे,शार्पशूटर अजय मराठे व त्यांची चमू यांनी केली आहे. यावेळी ब्रह्मपुरी वनविभागाचे सहाय्यक उपवन संरक्षक महेश गायकवाड,चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर,ब्रह्मपुरी वन विभागाचे बायोलॉजिस्ट राकेश अहुजा व वन कर्मचारी उपस्थित होते.सदर वाघाला चंद्रपूर येथील टी.टी.सी.सेंटर येथे पाठविण्यात आले असल्याने परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved