Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील जांभुळघाट येथे आज दिनांक ०९/११/२०२५ रोजी जुनी परीवार तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदा हि गुरु नानक जयंती चा ५५६ वा प्रकाश पर्व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात गुरु नानक देव जी यांच्या जीवना बद्दल व सर्व धर्माच्या कल्यान बद्दल महत्वाची माहीती देण्यात येते.शिख धर्मा चे प्रथम गुरू, गुरूनानक देव जी चा प्रकाश पर्व (जयंती) कार्यक्रम सुरवात करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे आज ही या जयंती निमित्त जांभुळघाट येथे सात संगत एकत्रीत येत असते.

यावेळे सुखमनी पाठची समाप्ती केली जाते त्या नंतर अरदास व गुरूनान देव जी यांच्या शिक्षण व देव रूपीची मोलाची माहीती ठरावीक व्यक्ती कडून केली जाते. या वेळी सुखमनी साहाब ची समाप्ती पाट्टी स. जरनेलसिंग टॉक रा.( हिंघणघाट) यांनी केली.त्या नंतर गुरूनान देवजी बद्दल मोलाचे मार्गदशन पाट्टी स.गुरुदेवसिंग दुधानी ,(गडचिरोली) व हट्टीलासिंग डांगी (ठानेगाव) यांनी मोलाची माहीती दिली.त्या नंतर काही व्यक्तीचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन कूलदिपसिंग अंध्रेले (वाहनगाव) व आभार स.अदबसिंग जुनी यांनी केली.त्या नंतर लंगर ( महाप्रसाद ) चा कायकर्म करण्यात आला. यावेळी सर्व एकत्री येऊन या कार्यक्रमात सहभागी झाल्याने प्रकाश पर्व चा कार्यक्रम जांभुळघाट जुनी परीवार तफ्रे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
ज्वाला समाचार सच का सामना