Breaking News

नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करणे हे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे काम

Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in

* वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून टोपी फिरवनारे आश्वासन नको *

* कॅमेरे लावून चालनार नाही – केवलसिंग जुनी यांची मागणी (तालूका संघटक शिवसेना उ.बा.ठा) *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यात वाघ व इतर वन्य प्राण्यांनी धूमाळकुळ घातला आहे. तालुक्यात दोन महीन्यात वाघाच्या हल्यात तीन शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. त्याच बरोबर तीन नागरीक ही वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन घरी बसले आहे.तद्वतच अनेक पाळीव प्राण्यांचा वाघाने शिकार केली.शंकरपूर,आंबोली,लावारी,गडपिपरी,शिवरा,शिरसपुर या परीसरात वाघामुळे तीन शेतकऱ्यांनी आपले जीव गमावले आहे.अनेक पाळीव प्राण्याची शिकार वाघाने केली आहे.

या परीसरात नरभ वाघ शेतामध्ये व गावा भोवताल फिरत आहे.असे असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून नागरीकांना व शेतकाऱ्यांना टोपी फिरवणारे आश्वास दिले जात आहे.आठ दिवसात,पाच दिवसात,तीन दिवसात अश्या प्रकाची खोटे आश्वासन वनविभागा कडून दिले जात आहे.दुसरी कडे शेतकऱ्याचे आठ-आठ दिवसात जीव जात आहे.आम्ही कॅमेरे लावले व चाळीस ते पन्नास वन कर्मचारी तैनात केले आहे.पण वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाच्या वनकर्मचाऱ्यांना यश येत नसेल तर कॅमेऱ्यांचा व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा काय उपयोग?असा प्रश्न उबाठाचे चिमूर तालुका संघटक केवलसींग जुनी यांनी केला आहे.

निष्पाप नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जीव जर वाघ नियमीत घेत असतील तर अशा नरभक्ष वाघांना ठार करा किंवा त्यांचा बंदोवस्त करा हे वनविभागाची जबाबदारी आहे असाही सवाल केवलसिंग जुनी यांनी केला आहे.पण आमच्या शेतकऱ्यांचे व नागरीकांचे जीव जाता कामा नये.चिमूर तालूक्यातील सर्व गावांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे.देशाच्या सीमेवर आंतकवाद्याची जेवढी दहशत नसेल तेवढी चंद्रपूर जिल्हात वाघांची दहसत झाली आहे.चिमूर तालुक्यातील त्या नरभक्ष वाघाचा बंदोबस्त १५ दिवसात न केल्यास शिवसेना शुध्दा शेतकरी व नागरीकांच्या जीवासाठी रत्यावर उतरेल,असा इशारा केवलसिंग जुनी तालूका संघटक शिवसेना उ.बा.ठा.यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved