Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in
* शंकरपूर वासियांचा वनविभागावर रोश – गावाकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन सुरु *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दिनांक. ०५/११/२०२५ चिमूर तालुक्यातील शंकरपूर जवळ असलेल्या आंबोली रोडवरील बघेल यांच्या गोडाऊन च्या मागे असलेल्या शेतात शेतकरी ईश्वर भरडे यांना त्यांच्याच शेतात कापूस वेचत असतांनाच दबा धरून बसून असलेल्या पट्टेदार वाघाने अचानकपने हल्ला करून ठार केल्याची तिसरी घटना आज सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान घडली हे दृश्य इतके भयावह होते कि वनविभाग सुद्धा घटनास्थळी पोहचू शकले नाही.

वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा हि मागणी जुनी नसून ताजी असतांना देखील आंदोलन रास्ता रोको ला न बघता वनविभागाचे याकडे हेतूपूरस्पर दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. वनविभागाने नुसते कॅमेरे लावून बघण्यापेक्षा वाघाचा बंदोबस्त करावा जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करणे सोपे होईल.

मृतक शेतकरी ईश्वर भरडे वय ४५ वर्षे मूळचे राहणार शिवरा येथील राहिवासी असून ते २० ते २५ वर्षांपासून शंकरपूर येथे राहात होते.त्यांच्या पश्चात २ मुले व पत्नी असा आप्त परिवार आहे.जनतेचा रोष बघता वनविभाग कशाप्रकारे हि भूमिका हाताळेल आणि मृतक शेतकऱ्याचे प्रेत शव शव विच्छेदन करण्यासाठी केव्हा नेतील याकडे गावाकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना