Breaking News

भिसी पोलीसांची धडक कारवाई ७ आरोपीसह ६,००,०००/- किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

* पोल वरील विजेची अॅल्युमिनियम तार चोरीचा गुन्हा २४ तासाचे आंत उघड *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- आज दिनांक २७/०८/२०२५ रोजी फिर्यादी नामे नितेश कोंडुजी गव्हारे, सुपरवायझर समिक्षा अॅन्ड डिम्पल ईलेक्ट्रीकल कंपणी चामोशि, जि. गडचिरोली यांनी पोलीस स्टेशन भिसी येथे तक्रार दिली की, जांभुळघाट ते खापरी येथे जाणाऱ्या १७ पोलवरील विजेची अॅल्युमिनियम तार कि. १,००,०००/- रु. काही दिवसापुर्वी अज्ञात चोराने चोरुन नेली अशा फिर्यादी यांचे फिर्याद वरुन पो.स्टे. भिसी, जि. चंद्रपुर येथे अपराध क्र. ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची चोरी गंभीर असल्याने वरीष्ठांचे आदेशाने भिसी पोलीसांना तात्काळ तपास पथक तयार करुन गुन्हयाचा छडा लावण्याबाबत आदेश प्राप्त झाल्याने भिसी पोलीसांनी तपास पथक तयार करुन आरोपी व मुद्देमालाचा शोध घेत असता, वरील गुन्हयाचे अनुशंगाने मुखबिरव्दारे माहीती मिळाली की, जांभुळघाट येथील ०१) आनंद गुलाब नेवारे, वय-२१ वर्ष, ०२) मंगेश निलकंठ बारेकर, वय-२४ वर्ष, दोन्ही रा. जांभुळघाट यांनी काही दिवसापुर्वी जांभुळघाट परीसरातील ईलेक्ट्रीक सप्लायची अॅल्युमिनियमची तार चोरी केली आहे. अशा विश्वसनिय माहीतीवरुन पोलीस स्टेशन भिसी येथील तपास पथकाने वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, वरील गुन्हा केल्याचे कबुली दिली.

तसेच चोरी करण्याकरीता आम्हाला क्रिष्णा रमेश मिटपल्लीवार, वय-२३ वर्ष, रा. जांभुळघाट याने मदत केली. तसेच सदर चोरीचा माल जांभुळघाट येथील ०१) रोशन अन्नाजी हजारे, वय-२२ वर्ष, व कुणाल गणेश हजारे, वय-१९ वर्ष, यांना विक्री केली. यावरुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असता, त्यांनी चोरीची तार विकत घेतल्याची कबुली दिली. व सदरची तार आम्ही सागर अन्नाजी हजारे, वय-२६ वर्ष, व विजय नंदकिशोर भेंडवाल, वय-२१ वर्ष, दोन्ही रा. जांभुळघाट यांचे मदतीने आरोपी कुणाल हजारे याचे ईन्ट्रा कंपणीची चारचाकी गाडी क्र. एमएच ३४ बिजी ९४९७ यातुन घेऊन जाऊन जांभुळघाट ते खापरी रोडच्या बाजुला असलेल्या जंगली झाडी झुडपात लपवुन ठेवली. सदरचा लपवुन ठेवलेला मुद्देमाल ईलेक्ट्रीक सप्लायची अॅल्युमिनियमची तार कि. १,००,०००/- रु व ईन्ट्रा कंपणीची चारचाकी गाडी क्र. एमएच ३४ बिजी ९४९७कि. ५,००,०००/- रु. असा एकुण ६,००,०००/- रु. चा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक सा. चंद्रपुर सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर ईश्वर कातकडे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार, पोलीस स्टेशन भिसी, सपोनि मंगेश भोंगाडे, पोउपनि रविंद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोहवा अजय बगडे, पोअं सतिश झिलपे, पोअं श्रीकांत वाढई, पोअं रेखलाल पटले, पोअं वैभव गोहणे, यांनी कामगिरी पार पाडली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved