jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* रक्षाबंधन नात्यांचे अनमोल बंधन, रक्षाबंधन सण म्हणजे फक्त रेशमी दोरा नव्हे तर, भावा-बहिणीच्या नात्यातील विश्वास प्रेम आणि संरक्षणाची गाठ *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर येथे रक्षाबंधनाचा पवित्र व प्रेमळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष दिवशी माझ्या लाडक्या भगिनींनी भावाच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधली, आयुष्यभर साथ देणाऱ्या नात्याची आठवण करून दिली आणि सदैव आनंदी, निरोगी राहण्याचा आशीर्वाद दिला.

चिमूर क्रांतिभूमीचे भूमिपुत्र आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया हे भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे ऋणानुबंध जपण्याचे कार्य अविरत करत आहे, मी या क्रांतिभूमीत येऊन धन्य झाले असे प्रतिपादन भाजपच्या प्रवक्त्या व प्रखर नेत्या नुपूर ताई शर्मा या आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.

आयोजित रक्षाबंधन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून माजी आमदार मितेश भांगडिया,कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक भाजपच्या पूर्व राष्ट्रीय प्रवक्त्या तथा प्रखर नेत्या नूपुरताई शर्मा, चिमूर विधानसभा क्षेत्र आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया, श्रीकांत भांगडिया,जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे, भाजप राज्य परिषद सदस्य राजू पाटील देवतळे,भाजप चिमूर तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, निलमजी राचलवार,मंडळ अध्यक्ष मनीष तुम्पल्लीवार, गजानन गुडधे, भाजप युवानेते समीर राचलवार, संजय नवघडे,घनश्याम डुकरे,प्रकाश वाकडे, भीमराव ठावरी,बंटीभाऊ वनकर, पार्थ भांगडिया,अपर्णा भांगडिया, मेघाताई भांगडिया, ममता डुकरे, वंदना शेंडे, गीता लिंगायत यांचेसह अनेक मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

बहीण – भावाचे हे नातं केवळ धाग्यात गुंफलेलं नसून, त्यात असते आपुलकीची ताकद, परस्परांवरील विश्वास आणि संकटसमयी साथ देण्याची अमर वचनबद्धता. आज प्रत्येक भगिनीच्या डोळ्यातला स्नेह आणि मनातील शुभेच्छा ही माझ्यासाठी खरी संपत्ती आहे.माझ्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या या बहिणीचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही,याच बहिणीच्या ताकदीमुळे मला चिमूर विधानसभा क्षेत्राचा तिसऱ्यांदा आमदार बहुमान मिळाला.

मला रक्षाबंधन कार्यक्रम निम्मित राखी बांधायला हजारो महिला आल्या, खूप उशीर होऊन या भगिनीं माझा साठी थांबल्या आणि मला आशीर्वाद देऊनच गेल्या, आपण रक्षाबंधन सण फक्त आजच साजरा करतो परंतु मी माझ्या बहिणीच्या रक्षणासाठी वर्षातील प्रत्येक दिवस तत्पर राहील,या निमित्ताने माझ्या सर्व भगिनींना आणि त्यांच्या परिवारांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपलं नातं असंच जिव्हाळ्याचं, प्रेमाचं आणि विश्वासाचं राहो हीच प्रार्थना.

आजचा आयोजित रक्षाबंधन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता भारतीय जनता पार्टी च्या, कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले, सगळ्यांच्या प्रेम, आशीर्वादमुळे आजचा रक्षाबंधन कार्यक्रम आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य परिषद सदस्य राजू पाटील देवतळे,सूत्रसंचालन प्रा.जयंत गौरकर,किसान आघाडी चिमूरचे एकनाथ थूटे यांनी केले तर आभार भारती गोडे यांनी मानले.आयोजित रक्षाबंधन सोहळ्यास चिमूर विधानसभा क्षेत्रासह परिसरातील हजारोंच्या संख्येने महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.

माझ्या भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांची साथ आणि आपुलकी हीच खरी माझी ताकद आहे,तुमचं प्रेम आणि विश्वास माझ्यासाठी नेहमी ऊर्जा देणार आहे, मनापासून सगळ्यांचे आभार.
*आपलाच जनसेवक आपलाच भाऊ -आमदार बंटीभाऊ भांगडिया*
ज्वाला समाचार सच का सामना