Breaking News

शालेय हॉलीबॉल स्पर्धेत बियाणी स्कूल चे वर्चस्व

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

* विद्यार्थ्यांनी खेळ विद्या म्हणून खेळावा- संजयसिंग चव्हाण *

विशेष प्रतिनिधी – नागपूर

भुसावळ :- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्याद्वारे बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे शालेय शासकीय हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या सदर स्पर्धेचे उद्घाटन साईमत चे वृत्त संपादक संजयसिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुप च्या सचिव डॉ. संगीता बियाणी या होत्या. सदर प्रसंगी शाळेचे प्राचार्य डी.एम. पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भुसावळ तालुका क्रीडा समन्वयक डॉ. प्रदीप साखरे, क्रीडा भारतीचे बी. एन. पाटील. यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक खेळाडू प्रशिक्षक पंच उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

 

नंतर उद्घाटक संजयसिंग चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळ हा खेळ भावनेने खेळा परंतु खेळ विद्या म्हणूनच खेळला पाहिजे ज्याप्रमाणे आपण अभ्यास विद्या म्हणून करतो विद्याही केव्हाही आपल्याला ग्रहण करता येते. हरलेल्या संघांनी पराभवाला खचून न जाता पुन्हा सराव करून यश संपादन करावे जिंकलेल्या संघांनी आपल्या तालुका जिल्हा राज्याचे नाव उंचावून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत कसे जाता येईल यासाठी प्रयत्न करावे अशा सर्वांना सूचना व शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष भाषण डॉ.संगीता बियाणी यांनी केले.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे १४ वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक बियाणी पब्लिक स्कूल, द्वितीय क्रमांक ताप्ती पब्लिक स्कूल, तृतीय क्रमांक बियाणी मिलिटरी स्कूल मिळवला. १४ वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक अहिल्यादेवी कन्या विद्यालय, द्वितीय क्रमांक बियाणी पब्लिक स्कूल मिरगव्हाण यांनी मिळवला. १७ वर्षातील मुलांमध्ये प्रथम क्रमांक बियाणी मिलिटरी स्कूल तर द्वितीय क्रमांक पंडित नेहरू विद्यालय वराडशीम यांनी तर तृतीय क्रमांक ताप्ती पब्लिक स्कूल ने मिळवला. १७वर्ष वयोगटातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ. द्वितीय क्रमांक बियाणी पब्लिक स्कूल मिरगव्हाण यांनी मिळवला तर तृतीय क्रमांक बियाणी मिलिटरी स्कूल ने प्राप्त केला. १९वर्ष आतील मुलां व मुलींन मध्ये.प्रथम बियाणी इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेज यांनी मिळवला.

सर्व विजय संघ जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरले सर्व विजय संघांना शुभेच्छा देण्यात आल्या पंच म्हणून हिम्मत पाटील, तोसीब कुरेशी, विजय संकेत, वंदना ठोके, दत्तू अहिरे, बी एन पाटील, निलेश राजपूत, अजय डोळे, आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे तालुका पदाधिकारी व बियाणी मिलिटरी स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved