jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर क्रांती भूमीत स्वातंत्र्याच्या लढाईत शहीद झालेल्या क्रांतिवीराणा नमन करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी किल्ला मैदानावर येऊन श्रद्धांजली अर्पण केली.इंग्रजी सत्तेविरुद्ध आवाज उठऊन 16 अगस्त 1942 ला चिमूर स्वतंत्र झाले. चिमूर स्वतंत्र झाल्याची घोषणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून केली होती. 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान भारतीय स्वातंत्र्यासाठी चिमूर क्रांतीभूमीतील शहीदाना नमन करण्यासाठी किल्ला परिसर अभ्यंकर मैदान येथे क्रांती ज्योत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. शहीद बालाजी रायपूरकर. क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले. सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके,आमदार कीर्तीकुमार भांगडीया,माजी खासदार अशोक नेते, वसंत वारजुकर,डॉ. श्याम हटवादे, गणेश तळवेकर सह सर्व राजकीय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित झाले होते.

यावेळी आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांनी शहिदांप्रती आपली भावना व्यक्त केली.चिमूर येथे वीर पत्नी श्रीमती सुलोचना महादेव मिसार. कमलाबाई कठाने यांचे घरी जाऊन शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. श्रद्धांजली कार्यक्रमानंतर नगर परिषद कार्यालय सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना डॉ.अशोक उईके यांनी चिमुरातील क्रांती वीरांचा इतिहास विसरता येणार नाही.

येथील इतिहास जिवंत ठेवण्यासाठी पाहिजे ते सहकार्य करणार असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे चिमूर अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष थिटे, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, पोलिस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसर, संतोष बाकल,तहसीलदार श्रीधर राजमाने, नगरपरिषद मुख्याधिकारी अर्चना वंजारी उपस्थित होत्या.
ज्वाला समाचार सच का सामना