Breaking News

चहांद येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिमा फलकाचे अनावरण

 

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

राळेगाव :- जिल्हातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून प्रतिमा फलकाचे अनावरण करण्यात आले. चहांद येथील मातंग समाज हा अत्यल्प असल्याने कुणीही पुढाकार घेण्यास तयार होत नसे गेली अनेक वर्ष प्रतिमा फलक लावण्यात अपयशी ठरत असलेल्या युवकांनी अखेर या सुवर्ण असलेल्या लोकशाहीरांच्या जन्मदिनी प्रयत्न सफल झाले. चहांद येथे प्रथमच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी समाज बांधव व गावातील तरुण युवक व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा फलकाचे उदघाट्न प्रमुख पाहुणे, शंकर राऊत व चारुदत्ता पाटील, शरद कांबळे, मनमोहन चांदेकर, सुभाष कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले पहिल्याच वर्षी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली प्रतिमा फलकापासून रमामाता बोद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेलापूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले व लोकशाहीरांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.

नंतर रॅलीचे प्रस्थान स्थानिक चौकातील भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व हारर्पण करून अभिवादन केले. यावेळी एस टी, एस सी, ओबीसी बांधव हजर होते यावेळी चारुदत्त अशोकराव पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल मोलाचे उपस्थिताना मार्गदर्शन केले यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हजर होते तसेच शंकरभाऊ राऊत (सामाजिक कार्यकर्ते )मनमोहन चांदेकर, सुभाष कांबळे, शरद कांबळे, संजय गेडाम, देविदास सिडाम, प्रमोद तामगाडगे, दीपक खडसे. महेश खडसे, उत्तम खडसे, जयश्री खडसे, नैनाताई खडसे, मालाताई चांदेकर, बाळा खडसे आदी. हजर होते.कार्यक्रमाचे संचालन महेश खडसे तर आभार शरद कांबळे यांनी मानले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved