Breaking News

‘मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र’ या शस्त्रक्रिया मोहिमेचा शुभारंभ

 

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 25 : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 22 जुलै ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीत ‘मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र’ ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. दूरदृष्यप्रणालीद्वारे आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे (बोर्डीकर) यांच्या हस्ते राज्यस्तरीय उद्घाटन झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय येथेसुध्दा सदर मोहिमेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महादेव चिंचोळे, उद्घाटक म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तारासिंग आडे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. उल्हास सरोदे, डॉ. जिनी पटेल, विशाल निंबाळकर उपस्थित होते.

मोतीबिंदुची वाढती संख्या व सर्वसामान्य जनतेपर्यंत सेवा पुरविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टी क्षीणता कार्यक्रम अंतर्गत चंद्रपुर जिल्ह्यात एकूण 98 मोतिबिंदु शस्त्रक्रिया करून शुभारंभ करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे म्हणाले, या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात 58 शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून 2 हजार मोतिबिंदु शस्त्रकिया करण्याचे उद्दिष्ट आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तारासिंग आडे यांनी केले. संचालन नेत्रचिकित्सा अधिकारी निशा चांदकेरांनी तर आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके यांनी मानले. यावेळी मेट्रन माया आत्राम मेट्रन, प्राचार्य , पुष्पा पोटे, मंदा बोरकर, मंगला वरखड़े, सुजाता मंडल, माधुरी कुळसंगे, योगेंद्र इंदोरकर, नयना चौके, दिपक डंबारे, विकास वाढई, अनिल मल्लोजवार तसेच कार्यालयीन कर्मचारी व नर्सिंग स्कूलचे प्राध्यापक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved