Breaking News

कॉ. आबासाहेब काकडे यांच्या १०६ व्या जयंती सोहळ्या निमित्त आयोजित ‘आठवणीतले आबासाहेब’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

 

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 28 जुन वार शनिवार रोजी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्यजित तांबे यांनी सांगितले की शिक्षण आणि सहकाराच्या माध्यमातून समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जगन्नाथ उर्फ आबासाहेबांनी आपले तत्व आणि विचारांशी कधीही प्रतारणा केली नाही. पर्यायाने त्यांना क्षमतेपेक्षाही कमी संधी मिळाल्या. व्यवस्थेविरुद्ध काम करणारी किंवा आवाज उठवणारी कृती ही बंडखोरी ठरवली जाते.परंतु अशी बंडखोरी सकारात्मक असते. बंडखोर स्वभावाचा माणूस असणं हे समाजाच्या प्रगतीचे लक्षण आहे. अशा स्वभावाच्या आबासाहेबांनी समाजाच्या प्रगतीसाठी माती आणि जगाशी नातं जोडणाऱ्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्याने समाज उभारणीच मोठ कार्य उभा राहिल्याचे गौरव उदगार काढले त्याच बरोबर शिवाजीराव उर्फ विद्याधर काकडे यांनी आपल्या वडिलांचा जगन्नाथाचा रथ अव्याहतपणे ओढण्याचे काम काकडे शिक्षण समुहाच्या माध्यमातुन सुरु ठेवल्याचे सांगितले.

पुढे बोलताना आमदार तांबे म्हणाले की, गोरगरिबाच्या विकासासाठी आबासाहेबांनी गावोगावी शिक्षण संस्था उभारल्या, वसतिगृह काढली, पाणी प्रश्नावर काम केले आणि सत्यनिष्ठ भूमिकेचा अंगीकार करत तळागाळातील माणसाच्या भल्यासाठी अव्याहतपणे कार्य उभा केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपले संपूर्ण आयुष्य सामान्य माणसाच्या सुधारणेसाठी दिल्याचे मधुर फळे आज अनेक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणारे अनेक जण अनुभव आहेत असेही ते बोलतांना म्हणाले. यावेळी ‘आठवणीतले आबासाहेब’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कोर्स’ व ‘पाककला शिक्षण उपक्रमा’चे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, जि.प.सदस्य विक्रम तांबे, चपराक प्रकाशन पुणे चे संपादक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम पाटील, राज्य अभ्यासक्रम व पुनर्रचना मंडळाचे सदस्य तथा पुस्तकाचे संपादक संदीप वाकचौरे, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ऍड..डॉ. विद्याधर काकडे, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ.हर्षदा काकडे,शैक्षणिक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.लक्ष्मण बिटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंह काकडे,जनशक्ती मंच शेवगांव चे जगन्नाथ गावडे, अॅड.सुभाष भोर,अभिजीत लुनिया,गोरक्ष मदने,सुधीर तनपुरे, काँग्रेस आय चे अध्यक्ष डॉ.अमोल फडके,डॉ.हेमलता लाखे, शुभांगी पाटील,प्रा.रामराजे लाखे,अनिल पाटील,प्राचार्य संपत दसपुते व्यासपीठावर आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्याधर काकडे यांनी केले तर सूत्र सूत्र संचालन प्रा गोविंद वाणी आणि प्रा जरीना शेख यांनी केले कार्यक्रमाचा समारोप वंदेमातरम या गीताने करण्यात आला.

*ताजा कलम*

*समाजाबद्दल तळमळ असणाऱ्या पिढीमुळे वेगवेगळ्या सामाजिक चळवळी उभा राहिल्या आणि यशस्वीही झाल्या. पर्यायाने बिघडलेल्या अवस्थेत देखील समाज रचना व्यवस्थित चालू असते.याच कारणीभूत असलेली अशी माणसे अलीकडे कमी झाल्याचे वास्तव आठवणीतले आबासाहेब या पुस्तकाचे संपादक प्रा.संदीप वाकचौरे यांनी केले.जगाशी नातं जोडणाऱ्या नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमास प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे. बहुदा जिल्ह्यामध्ये AI ला अनुसरून पाठ्यक्रमाची सुरुवात होणे ही पहिलीच वेळ असल्याचे आ.तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले.*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved