jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
*दोन बैल बचावले एक मरण पावला*
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे आज दिनांक 25 जुन ला दुपारी अंदाजे 12 ते 1 च्या दरम्यात गावात लगत नाल्यावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना बैलगाडी व एक बैल तरंगताना दिसला तेव्हा त्यांच्या लक्षात आल याठिकाणी कोणीतरी बुडून आहे तेव्हा त्यांनी गावात माहिती दिली गावातील लोकांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली व सदर घटनेची माहिती वडकी पोलिसाला दिली असतात पोलिस घटनास्थळी दाखल झाले व नंतर गावातील युवकांनी पाण्यात उडी मारुन शेतकऱ्यांचा शोध घेत असताना बैलगाडी व बांधुन असलेला एक बैल मरण पावलेला मिळाला व नंतर एक ते दोन तासांच्या शोध कार्या नंतर शेतकऱ्यांचा मृत्यूदेह हाती लागला पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर दहेगाव येथील शेतकरी राजु रोकडे वय 55 वर्षे हे असल्याचे सिद्ध झाले.
कुटुंबा कडुन मिळाले माहिती नुसार राजु रोकडे शेतात कामासाठी जात होते नाल्यावर बैल पाणी पिण्यासाठी घेऊन गेले असतील असा अंदाज लावण्यात आला. सदर मृत्युदयाचा वडकी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय करंजी येथे पाठविण्यात आले सदर घटनेचा तपास वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सुनील कुडमथे धनंजय येसेकर पो ,हा होमगार्ड प्रविण चौधरी करित आहे,मृत्यूच्या पश्चाताप पत्नी, मुलगा मुलगी जावई सुन नातवंडे असा आप्त परिवार आहे.
ज्वाला समाचार सच का सामना