Breaking News

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही १,७०,७०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

* अवैधरित्या कत्तलीकरीता वाहतुक होणारे ६ ट्रक पोलीसांच्या ताब्यात *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर : – दिनांक. २१/०६/२०२५ रोजी प्राप्त माहिती वरून काही ट्रक मध्ये जनावरे (गोवंश) यांचे हात, पाय, तोंड बांधुन व्यवस्था न करता वाहनाच्या डाल्यात क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात गाई-बैल (गोवंश) यांना दाटीने धरून त्यांची कत्तली करीता वाहतुक करीता घुग्घुस मार्ग पडोली, चंद्रपुर असे तेलंगना येथे अवैधरित्या वाहतुक करीत आहे अशा माहिती वरून धानोरा टोल नाका, घुग्घुस रोड येथे नाकाबंदी करून खबरे प्रमाणे ०६ आयसर ट्रक हे गुग्घुसचे दिशेने आले. त्यावरून नमुद ट्रकची पंचा समक्ष पाहणी केली असता, वेगवेगळया ट्रक मध्ये जनावरे गोवंश यांचे हात, पाय, तोंड बांधुन व्यवस्था न करता वाहनाच्या डाल्यात क्षमते पेक्षा जास्त प्रमाणात गाई-बैल गोवंश) यांना दाटीने भरून त्यांची कत्तली करीता वाहतुक करतांना मिळुन आले. सदर वाहनाचे चालक, क्लिनर यांना वाहतुक करीत असलेल्या जनावरा बाबत कागदपत्र मागीतले असता त्यांनी भंडारा, गोदिया येथुन जनावरे खरेदी केल्याचे पावत्या सादर केल्या. त्यावरून सदर पावत्या संबंधाने पडताळणी केली असता जनावरे वाहतुक करीत असलेल्या पावत्यावर सरकारी अधिकारी यांची बनावट सही करुन त्याव्दारे सदर वाहतुक ही कायदेशिर असल्याचे दाखवुन अवैधरित्या प्राण्यांची क्रूरपणे वाहतुक करत होते, त्यावरून नमुद ट्रक चालकांकडुन ६ ट्रक, जनावरे वाहतुक करण्यासाठी वापरलेली पायलटींग वाहन व एकुण ७२ गोवंश असा एकुण १,७०,७०,०००/- रू चा माल जप्त करून एकुण १८ आरोपीतां विरूध्द पोलीस स्टेशन, घुग्घुस येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

अवैधरित्या कत्तली करीता वाहतुक करीत असलेले जनावरे हे सुरक्षेच्या दृष्टीने प्यार फाउंडेशन, छोटा नागपुर, जि. चंद्रपुर यांचेकडे जमा करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर,अपर पोलीस अधिक्षक रीना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि. बलराम राडोकार, पोउपनि, विनोद भुरले, पोउपनि, संतोष निंभोरकार, पोउपिन सुनिल गौरकार, सफौ/धनराज फरकाडे, पोहवा/सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा /रजनिकांत पुठ्‌ठावार, पोहवा/जयसिंग,पोहवा/गणेश मोहुर्ले, नापोशि/संतोष येलपुलवार, पोशि/नितीन रायपुरे, पोशि/प्रशांत नागोसे, पोशि/किशोर काटे, पोशि/शशांक बदामवार, चपोहवा / दिनेश अराडे, चपोशि/रूषभ बारसिंगे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर सेच पोलीस स्टेशन, घुग्घुस येथील सपोनि तायवाडे असे अधिकारी व कर्मचारी तसेच पशुधन विकास अधिकारी, घुग्घुस यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved