jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
▪️बॉम्बच्या धमकीमुळे विमानाची सुरक्षा यंत्रणेकडून तपासणी
▪️बॉम्ब धमकी ठरली अफवा
विशेष प्रतिनिधी – नागपूर
नागपूर,दि. 17 : कोचीन येथून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सचे 6E-2706 हे विमान आज सकाळी नागपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरविण्यात आले. कोचीन येथील एअर ट्रॅफिक कंट्रोल (AAI Area Control) विभागाला बॉम्ब धमकीचा संदेश प्राप्त झाल्यानंतर तत्काळ हे विमान नागपूर विमानतळावर वळविण्यात आले. सकाळी 11:23 वाजता नागपूर येथे ते सुरक्षितपणे उतरले. या विमानात 157 प्रवासी आणि 06 क्रू सदस्य प्रवास करत होते.नागपूर येथे विमानाच्या लँडिंगअगोदर सुरक्षा यंत्रणेने चोख बंदोबस्त करुन विमान व सर्व साहित्याची तपासणी केली. प्रवाशांना तत्काळ सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षाबल अंतर्गत एअरपोर्ट सुरक्षा बल, विमानतळ बॉम्ब शोध पथक व नागपूर शहर पोलिसांचे बॉम्ब शोध पथकाने इंडिगो विमानाची आणि प्रवाशांच्या सामानाची सखोल तपासणी केली.

या तपासणीत कोणतेही स्फोटक उपकरण किंवा साहित्य आढळले नाही. या घटनेदरम्यान कोणतीही जीवितहानी, मालमत्ता अथवा विमानतळाशी संबंधित नुकसान झालेले नाही. सुरक्षा तपासणीनंतर विमानाला पुढील उड्डानासाठी परवानगी देण्यात आली. सर्व 157 प्रवासी आणि 06 क्रू सदस्यांना पुन्हा विमानात बसवून विमान दुपारी 03:10 वाजता नागपूरहून रवाना झाले.इंडिगो एअरलाईन्स आणि अन्य संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून सर्व सुरक्षा प्रक्रिया काटेकोरपणे राबवण्यात आल्या. मिहान इंडिया लिमिटेड, केंद्रीय औद्योगिक सुरक्षाबल अंतर्गत एअरपोर्ट सुरक्षा बल, विमानतळ बॉम्ब शोध पथक व नागपूर शहर पोलिसांचे बॉम्ब शोध पथक, एस आय बी, इंडिगो एअरलाईन्स, सोनगाव पोलीस ठाणे आदी यंत्रणांनी उत्तम समन्वय साधून कारवाई पार पाडली.
ज्वाला समाचार सच का सामना