Breaking News

व्हिडीओ प्रसारीत करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

” व्हिडीओ बनविणारा व वायरल करणारे ७ आरोपी पोलीसाच्या ताब्यात “

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- दिनांक ०६जुन, २०२५ रोजी रात्रौ itz_chandrapur या Instagram चॅनलवर “बल्लारशाह-कारवा रोडपर रात गोमाता के साथ दुष्कर्म का प्रयास” असा उल्लेख केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करुन व्हॉयरल झाल्याने बल्लारपूर येथील बजरंग दल आणि ईतर संघटना यांनी आक्षेप घेवुन पोस्टे ला दिलेल्या रिपोर्टवरून अपराध क्रमांक ४०६/२०२५ कलम २९९, ३ (५) भारतीय न्याय संहिता व सहकलम ६७ माहिती व तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वप्रथम समाज माध्यमावरील नमुद आक्षेपार्ह व्हिडीओ डिलीट करुन घेण्यात आला. गुन्हयाचे सखोल तपासाअंती दृष्कृत्य करणारा इसम नामे प्रल्हाद भादु राठोड वय ६५ वर्ष, दृष्कृत्याचा व्हिडीओ बनविणारा नामे विजय मोहन पाल वय २२ वर्ष, तसेच ३ महिन्यानंतर सदर आक्षेपार्ह व्हिडीओ itz_chandrapur या Instagram चॅनलवर प्रसारीत करणारा शुभम सुधाकर खोब्रागडे वय २९ वर्ष व सदर व्हिडीओ समाज माध्यमावर वॉयरल करणारे हर्षद उर्फ गोलु रमेश घोटेकर वय २७ वर्ष, विजय मधुकर ढोक वय २६ वर्ष, पुरुषोत्तम ज्ञानबाजी सहारे वय ४२ वर्ष, नरेश शिवा वर्मा वय ३२ वर्ष सर्व रा. बल्लारपूर यांना गुन्हयाच्या पुराव्याअंती अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोस्टे बल्लारपूर चे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्याम गव्हाने यांचे नेतृत्वात सहा. पोलीस निरीक्षक श्री मदन दिवटे, पोउपनि प्रेमशहा सयाम, पोहवा संतोष दंडेवार, पोअं शरदचंद्र कारुष, वशिष्ट रंगारी, भास्कर चिंचवलकर, सचिन राठोड पो.स्टे. बल्लारपूर आणि सायबर पोलीस स्टेशन यांनी केली आहे.

याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, समाज माध्यमांवर पोष्ट टाकतांना सामाजिक बांधीलकी ठेवावी, कोणत्याही जाती/धर्माची भावना दुखाविणारे पोष्ट टाकु नयेत. अशा प्रकारच्या कोणतीही कृत्य किंवा पोष्ट आढळुन आल्यास त्वरीत त्याची माहिती पोलीसांना देवुन सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved