Breaking News

पत्रकार सिध्दार्थ भोकरे यांना धमकी देणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

 

” महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा – चिमूर तर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी चिमूर यांना दिले निवेदन “

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना एका अज्ञात व्यक्तीने निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे.सदर धमकी अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने धमकी देणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी व सिध्दार्थ भोकरे यांना संरक्षण द्यावे या अनुषंगाने चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा चिमूरच्या वतीने निवेदन देण्यात आले.दिनांक १५ मे २०२५ रोजी एका दैनिकात ‘सिंदुर ऑपरेशन ‘ संदर्भात त्यांनी व्यक्त केलेल्या मतानंतर ही धमकी अज्ञात इसमाने दिली असून त्या पत्रात ‘ माफी माग नाहीतर तुला उडवून देऊ ‘असा थेट इशारा दिला. ही घटना पत्रकारांच्या सुरक्षिततेला, व पत्रकारांच्या मत स्वातंत्र्याला धोकादायक असून या विरोधात राज्यभरातुन तीव्र विरोध केला जात आहे.राज्य पत्रकार पत्रकार संघाचे वतीने संबंधित अज्ञात व्यक्तींवर त्वरित कारवाई करुन त्याला अटक करण्यात यावी आणि सिध्दार्थ भोकरे यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी चिमुर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा चिमुर तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी डिजीटल मिडीया चंद्रपूर जिल्हा सचिव तथा म.रा.पत्रकार संघ मुंबई चे चिमूर तालुका अध्यक्ष केवलसिंग जुनी,संघटक विलास मोहीनकर, सदस्य सुशांत इंदोरकर,सुनिल हिंगणकर,समीर बल्की,शारदूल पचारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनाची प्रत पोलिस अधीक्षक चंद्रपूर,जिल्हाधिकारी चंद्रपूर,तसेच पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे,उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे यांना सादर करण्यात आली.पत्रकार संघाने इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर आरोपीस अटक झाली नाही व भोकरे यांना सुरक्षा दिली गेली नाही तर राज्य भरातील पत्रकार रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा राज्य अध्यक्ष गोविंद वाकडे,राज्य सरचिटणीस विश्र्वासराव आरोटे राज्य उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे यांनी आधीच दिला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved