Breaking News

गुणवंतांना प्रेरणा देणारा अभिष्टचिंतन सोहळा – सचिन राजुरकर

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

* सत्कार समारंभ सोहळा थाटात पार पडला *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा व स्फुर्ती देणारा हा अभिष्टचिंतन सोहळा असल्याचे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी कवडू लोहकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्या उद्घाटक प्रसंगी बोलत होते.आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुणवंतांना आनंद देण्याचे कार्य कवडू लोहकरे यांच्या हातून घडत असल्याचे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुकाध्यक्ष मारोतराव अतकरे बोलत होते.

**5 जुन जागतिक पर्यावरण दिन सोबतच योगायोग म्हणजे पर्यावरणासाठी काम करणारे पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांचा जागतिक पर्यावरण दिनी असलेला वाढदिवस योगायोग आहे***

ह्या दिवशी वृक्षारोपणाचे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जातात. ह्याच पर्यावरण दिनानिमित्त नवोदय पात्र विद्यार्थी व 10 व 12 वीत तालुक्यातुन प्रथम येणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा चिमुर येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सहकारी पतसंस्थेत पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृषीभुषण मोरेश्वर झाडे , अमोद गौरकार, ओबीसी योद्धा रविंद्र टोंगे, शिक्षण विस्तार अधिकारी तुळशीदास महल्ले, माधुरी रेवतकर आदी मान्यवरांची भाषणे झाली.

**सत्कार मुर्ती**

नवोदय पात्र विद्यार्थी स्पर्श चौधरी,मधुर मेश्राम,स्वरा गेडाम,आरोही चुणारकर यांचा सत्कार करण्यात आला.तर 10 वी बारावीत तालुक्यातुन प्रथम येणारे सारिका निकुरे,डिंपल राऊत, वेदांत थुटे,रोहीणी बलखंडे , शर्वील देविकर , श्रावणी हनुमंते,गितेश पराते, लोकमत सरपंच आफ दी ईअर वैभव ठाकरे , कराटे पट्टू कुंजली पिसे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे, सुत्रसंचलन रामदास कामडी, मिनाक्षी बंडे तर आभार प्रभाकरराव पिसे यांनी मानले . कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved