jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
विशेष प्रतिनिधी – नागपूर
नागपूर :- महाराष्ट्र पत्रकार संघाच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधन आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात भव्य उत्साहात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमास विशेष रंगत आणली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत वृक्षदान आणि कोल्हापुरी फेटा बांधून, हलगीच्या गजरात सन्मानपूर्वक करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवर व कर्तृत्ववान पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात पत्रकारितेच्या समोरील आव्हाने आणि विश्वासहर्ता यावर बोलताना प्रमुख वक्ते किरण सोनावणे म्हणाले, पत्रकार हा समाजाचा सजग प्रहरी आहे. तो केवळ घटना सांगत नाही, तर समाजाची दिशा ठरवतो. अशा पत्रकारांचे मनोबल उंचावणारे उपक्रम काळाची गरज आहेत.कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार व पोलीस यांच्यातील समन्वयाच्या गरजेवर भर दिला.सकारात्मक कामांची दखल घेऊन समाजात विश्वास निर्माण करण्याचे काम पत्रकारांनी करावे, असे ते म्हणाले.खासदार धैर्यशील माने यांनी स्पष्ट शब्दांत पत्रकार हा समाजाचा आरसा असून लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. आमदार अशोकराव माने, यांचा वाढदिवस असूनही त्यांनी अधिवेशनाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. माजी आमदार सुजित मिणचेकर, राजू किसनराव आवळे, तसेच विजयसिंह माने, विनायक भोसले, अविनाश बनगे आदींचीही उपस्थिती होती.
मान्यवर राज्याध्यक्ष कोळेकर यांनी संघटनेच्या स्थापनेपासूनचा प्रवास उलगडत सांगितले की, २००४ मध्ये स्थापना झालेल्या संघटनेच्या २१ व्या अधिवेशनाची यजमानी कोल्हापूर जिल्ह्याला मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे.यावेळी सुनिल कांबळे यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये, तालुकाध्यक्ष पापालाल सनदी, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपाधीक्षक सदानंद सदाशिव यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्कारमूर्तीना कोल्हापुरी फेटा, स्मृतिचिन्ह आणि शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. बाहेरून आलेल्या पत्रकारांचा सत्कार ‘लोकराजा छत्रपती शाहू महाराज’ यांच्या प्रतिमेद्वारे करण्यात आला.कार्यक्रमासाठी भव्य हॉल, अद्ययावत ध्वनीव्यवस्था, आरामदायक बैठक व्यवस्था यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बांधव व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून यावेळी पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ज्वाला समाचार सच का सामना