jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- रमाई बौद्ध महिला मंडळ समता नगर वडाळा (पैकु) चिमुर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा. तथागत बुद्ध हे गणराज्य लोकशाही चे प्रणेता होते असे उद्गगार निळकंठ शेंडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना व्यक्त केले.पुढे बोलताना त्यांनी भ.बुदधाच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग विषद केले.
वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला याचं दिवशी तथागताला बुद्ध ज्ञान प्राप्ती झाली व याचं वैशाख पौर्णिमेला तथागताचे निर्वाण सुद्धा झाले.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बुद्धिष्ट माणसाने दर रविवारी बौद्ध विहारात जाऊन धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे असे ते म्हणाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डि.एम नन्नावरे से.नि.मुख्याध्यापक तर प्रमुख पाहुणे म्हणून
डॉ.महेश खानेकर,याशिरिष घोनमोडे व प्रा.चंद्रभान खंगार यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन लोखंडे,प्रास्ताविक सुधाकर पाटील तर आभार वावरे यांनी केले.रमाई बौद्ध महिला मंडळाच्या महिलांचे विशेष सहकार्य लाभले.
ज्वाला समाचार सच का सामना