Breaking News

संडे स्पेशल दणका वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी झुलवत ठेवणाऱ्या शेवगांवच्या सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या गावपुढाऱ्यांचा मणका

!!! फक्त उदघोषना बाकी असलेल्या शेवगांव नगरपरिषदेची निवडणूक ऐन पावसाळयात होण्याची शक्यता !!!

अविनाश देशमुख शेवगांव – 9960051755

शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे कि रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात घेण्याचे निर्देश राज्यसरकारला दिले. त्यामुळे त्यासाठी गेल्या अनेक वर्ष तयारी करणाऱ्या शहरातील बिनीच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. नगरपरिषद निवडणुकी साठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. स्थानिक संस्थांवरील प्रशासक राज संपून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पदाधिकाऱ्यांचा अंकुश निर्माण होईल.शहरातील नागरिकांच्या प्रलंबीत प्रश्न सोडवण्यासाठी त्यामुळे मदत होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये इतर मागासवर्गीयांच्या OBC आरक्षणाच्या
अनिश्चिततेमुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निराशा
पसरली होती त्यामुळे मुदत संपल्यानंतरही नगरपरिषद, सह ईतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका रखडल्या होत्या. शेवगाव नगरपरिषदेची मुदत पाच वर्षांपूर्वीच संपली आहे. २१ सदस्य असलेल्या नगरपरिषदे मध्ये राष्ट्रवादीचे नऊ, भाजपचे आठ व अपक्ष चार असे पक्षिय बलाबल होते.

त्या आधारे राष्ट्रवादी आणि भा.ज.पा. दोन्ही प्रमुख पक्षांनी आलटून पालटून अडीच वर्षे सत्ता उपभोगली. फुसऱ्या टर्म मध्ये अनेक राजकीय उलथापालथ व फाटाफूट होऊन राष्ट्रवादीकडील नगरसेवक फोडुन भाजपने सत्ता मिळवली. मात्र, गेल्या साडेचार वर्षांत शहरातील राजकीय वातावरण पूर्ण बदलले असून, प्रभाग रचना व त्याच्या आरक्षणाबाबत अनिश्चितता असल्याने इच्छुकांत संभ्रम निर्माण झाला आहे. युती सरकारच्या निर्णयानुसार थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने या पदाबरोबर उपनगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांची विविध पक्षाकडे मोर्चेबांधणी सुरू आहे. नगरपरिषद शहराशी संबंधित महत्त्वाची संस्था असल्याने शहरातील अनेक प्रश्नांना खीळ बसली होती. नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची तयारी निष्फळ ठरली होती. सुरवातीला आपापल्या प्रभागातील नागरिकांच्या छोट्यामोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावून जनसंपर्क ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या अनिश्चिततेमुळे निराशा पसरली होती. ओ.बी.सी. आरक्षण या मुद्यावरून निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली होती. तो मार्ग आता मोकळा झाल्याने सरकारला येत्या 120 दिवसात ऐन पावसाळ्यात निवडणूक घेणे भाग आहे.

*ताजा कलम*

*ज्यांनी गेली कित्येक वर्षे शेवगांव शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी झुलवत ठेवले आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवगांव शहराचा 15 दिवसाला येणारे पाणी हाच इलेक्शन चा कळीचा मुद्दा होणार असुन अहिल्यानगर जिल्ह्यात फक्त शेवगांव शहराचं असे असेल ज्याची निवडणूक रस्ते पाणी आणि वीज या मुलभूत प्रश्नाच्या भोवती फिरणार आहे.*

*[ क्रमशः ]*

*या निवडणुकीला विधान सभेच्या झालेल्या उलथापालथीची किनार या निवडणुकीला उमेदवारी वाटताना दिसणार आहे अनेकांचे पत्ते उमेदवारीतच कट होण्याची शक्यता आहे त्यातून राष्ट्रवादी आणि भा.ज.प. वर नाराज असलेला तिसरा एक प्रबळ गट स्थापन होऊन निवडणुकीला सामोरा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे ???*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved