Breaking News

खैरी येथे संयुक्त जयंती महोत्सव निमित्त सदाबहार प्रबोधन कार्यक्रम संपन्न

 

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील खैरी येथे दिनांक २०/४/२०२५ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या संयुक्त विद्यमानाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मैदान खैरी येथे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदाबहार प्रबोधनाचा लोक हितेशी वसा बहुजनात पेरण्याच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित समाज प्रबोधनकार डॉक्टर रामपाल महाराज धारकर (सप्त खंजिरी वादक) सत्यपाल महाराज व संदीप पाल महाराज यांचे शिष्य अमरावती यांनी आपल्या कार्यक्रमातून महापुरुषाच्या वैचारिक वारसा आपल्या प्रबोधनातून सादर केला.

यावेळी१४ एप्रिलला आयोजकांनी घेतलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्या शालेय विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरेशराव कुंभलकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा खैरी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुखदेव बोरखडे साहेब पोलीस निरीक्षक वडकी अंकुश भाऊ मुनेश्वर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव श्रीकांत राऊत सरपंच खैरी रविभाऊ निव्वळ अध्यक्ष सहकार खरेदी विक्री संस्था खैरी राजूभाऊ भेदुरकर पोलीस पाटील खैरी डॉक्टर विठ्ठल लढे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक कांबळे सामाजिक कार्यकर्ते इंन्द्रजीत लभाने सामाजिक कार्यकर्ते अरविंद भाऊ ठाकरे सरपंच कुंभा शैलेश भाऊ बेलेकर उपसरपंच ग्रामपंचायत वडकी हे होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक राहुल उमरे (अध्यक्ष) उमेश भारशंकर (उपाध्यक्ष) सुमेध भरणे (सचिव) अरविंद थुल(उपसचिव) प्रमोद सातकर व समस्त आयोजक मंडळ खैरी यांनी प्रबोधनात्मक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved