jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- दिनांक १४ एप्रिल २०२५ ला चिमूर येथिल दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण पोलिस स्टेशन चिमूर ला दाखल झाल्या प्रकरणी आरोपी रशीद रूस्तम शेख व नसीर वजीर शेख यांना अटक करण्यात आली. त्या रात्री चिमूर शहरातील जनतेच्या भावना भडकल्यामुळे पो. स्टे. चिमूर समोर फार मोठा जमाव गोळा झाला होता. चिमूरच्या जनतेचा रोष कमी झाला नसुन अत्याचार करणा-या दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी चिमूर तालुक्यात्यातील विविध संघटनांनी केली आहे आहे.

राज्यात व देशात अशा अनेक घटना घडत असून मुली व स्त्रीवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सामाजिक अस्थिरता निर्माण होत आहे महिलांवरील अत्याचार रोखण्याकरीता राज्यात व देशात फाशीच्या शिक्षेचा कायदा निर्माण करावा व गुन्हेगारास फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा शिवसाम्राज्य प्रतिष्ठान चिमूर व सर्व संघटनेच्या वतीने कायद्याच्या चौकटीत राहुन तिव्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुक्कामाँ सुदर्शन यांना अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
ज्वाला समाचार सच का सामना