जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांची घोडा रथ यात्रा दिनांक २ फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे.दिनांक १० फेब्रुवारी ला घोडायात्रा असून १३ फेब्रुवारी ला गोपाल काला चे आयोजन आहे.दिनांक २ फेब्रुवारी पासून नवरात्र प्रारंभ, ३ फेब्रुवारी ला रथ सप्तमी, ६फेब्रुवारी ला गरुड वाहन, ८ फेब्रुवारी ला मारुती वाहन, १० फेब्रुवारी ला घोडा रथ यात्रा, १२ फेब्रुवारी ला बाल श्रीकृष्ण जन्म, १३ फेब्रुवारी ला गोपालकाला २६ फेब्रुवारी ला महाशिवरात्री अश्या प्रकारे कार्यक्रम आयोजित असून दररोज रात्री हभप स्नेहल संतोष पित्रे डोंबिवली यांचे नारदिय कीर्तन होणार आहे.
पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या घोडा रथ यात्रा उत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन बोर्ड ऑफ ट्रस्टीज रन ए( ४३सी ) श्रीहरी बालाजी देवस्थान च्या विश्वस्त यांनी केले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना