Breaking News

राष्ट्रसंतांना अभिवादन; गोपाळकाल्याने गुंफा यात्रा महोत्सवाची सांगता – तपोभुमित उसळला गुरुदेव भक्तांचा महासागर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- विदर्भाची पंढरी समजली जाणारी वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या पदस्पशनि पावन झालेल्या तपोभूमी गोंदेडा येथे ६५ व्या गुंफा गोंदेडा यात्रा महोत्सवाला नऊ जानेवारीपासून सुरवात झाली.सोमवारला कीर्तन गोपाळकाला.मान्यवरांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाने यात्रा महोत्सवाची सांगता झाली. शेवटच्या दिवशी तपोभूमीत लाखो भक्तांनी वंदनीय महाराजांच्या तपोभूमीचे दर्शन घेतले.वंदनीय राष्ट्रसंतांच्या तपोभूमीत सोमवार दिनांक १३ जानेवारी रोजी सकाळी ग्रामसफाई करून नियमितपणे कार्यक्रमाला सुरवात झाली.गावातून रामधून व पालखी मिरवणूक काढण्यात आली.

यावर महादेव पिसे यांनी विचार प्रगट केले. यानंतर ध्वजारोहण गुंफा यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन गुरनुले यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी सोहळा पार पडला. यात 70 पालख्य सहभागी झाल्या. रक्तदान शिविर, आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले.गोपाळकाला संकीर्तन हभप लक्ष्मणदास काळे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. गुंफा यात्रा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. यात दिवाकर निलंकठ भोपळे यांची ईश्वरचिड्डीने अध्यक्षपदी निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी मंगला डांगे यांची निवड झाली. प्रास्ताविक विठ्ठल सावरकर यांनी केले.संचालन भास्कर वाढई यांनी,तर आभार लोनबले सर यांनी मानले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved