राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांची उपस्थिती
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- शिक्षणाच्या हक्कासाठी,शिक्षकांच्या सन्मानासाठी ब्रीदवाक्य असलेल्या शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा रवीवार,दि.२२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता चंद्रपूर येथील श्री विश्वकर्मा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे उपस्थित राहतील.प्रमुख अतिथी म्हणून विभागीय प्रसिद्धीप्रमुख राजाराम घोडके उपस्थित राहणार आहेत.जुनी सेवा,जुनी पेन्शन,कंत्राटीकरण,अशैक्षणिक कामे,ऑनलाईन कामे आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर या मेळाव्यात विचारमंथन होणार आहे.
शिक्षक भारतीच्या पदाधिका-यांनी व सर्व सदस्यांनी तथा शिक्षक बांधवांनी या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर शेरकी,कार्याध्यक्ष जब्बार शेख,सरचिटणीस राजेश घोडमारे,संघटक विरेनकुमार खोब्रागडे,विलास फलके,रावण शेरकुरे,कैलाश बोरकर,विजय मिटपल्लीवार,सुनील दुर्गे,राबिन करमरकर,निर्मला सोनवणे,रंजना तडस,माधुरी डोंगरकर आदींनी केले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना