Breaking News

चिमूर मध्ये संविधान दिनाचा अमृत महोत्सव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- संविधान सन्मान दिन समारोह समितीच्या वतीने चिमूर येथील संविधान चौकात दिनांक २६ व २७ नोव्हेंबर रोजी अमृत महोत्सवी संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक २६ नोव्हेंबर मंडाळवार ला सकाळी १० वाजता वक्तृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, गित गायन स्पर्धा व सायंकाळी ५ वाजता चिमूर नगरातील थोर महापुरुषांच्या स्मृती स्थळांना अभिवादन करण्यासाठी संविधान जनजागृती बाईक रॅली आयोजीत करण्यात आली आहे. सायंकाळी ७ वाजता सुप्रसिध्द प्रबोधनकार कवी-गायक रोशन राजा (नागपुर) यांचा जागर समतेचा संगितमय प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल.

दिनांक २७ नोव्हेंबर बुधवार ला सकाळी १० वाजता रांगोळी स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा झाल्यानंतर २ वाजता समता सैनिक दलाचा दुपारी ३ वाजता राष्ट्रीय ओबीसी मार्चपास डॉ बाबासाहेब आंबेडकर पूतळा चिमूर ते संविधान चौक वडाळा (पैकू) पर्यत काढण्यात येणार आहे. कर्मचारी अधिकारी महासंघाचे चंद्रपुर जिल्हा कार्याध्यक्ष रामदास कामडी यांच्या अध्यक्षतेखाली वैचारीक प्रबोधन तथा मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे उद्धघाटक विशेष अतिथी म्हणुन सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, यांचे हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी चिमूरचे ठाणेदार संतोष बाकल उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान भारताचे संविधान संवर्धन व त्यापुढील आवाहने या विषयावर अकोल्याचे आकाश पवार, भारताच्या संविधानाप्रती महिलांची जागरुकता या विषयावर वर्धा येथील प्रा. डॉ. माधुरी झाडे, भारताच्या संविधानाप्रती महिलांची जागरुकता या विषयावर वर्धा येथील प्रा. डॉ. माधुरी झाडे, भारताच्या संविधानाची व्यापकता व सर्व धर्म हितसंवर्धन या विषयावर ब्रम्हपुरीचे प्रा. संजय मगर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला परिसरातील नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संविधान सन्मान दिन समारोह समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved