Breaking News

चिमूर येथे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार कीर्तीकुमार बंटी भांगडीया विजयी

चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनतेचा विजयोत्सव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक अतिशय चुरशीची होणार असे चित्र दिसून येत होते. नागरीक याबाबत चौकाचौकात चर्चा सुद्धा करायची, कोणाच्या गळ्यात पडणार विजयाची माळ मात्र आज दिनांक २३ नोव्हेंबरला अखेर निकाल जाहीर झाला आणि आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकत विजयाची माळ आपल्या गळ्यात टाकली.

त्यांची लढत काँग्रेसचे बलाढ्य नेते डॉ. सतीश वारजुकर यांच्याशी होती त्यांना मागे ठेवत हॅट्रिक साधली. चिमूर तहसील कार्यालय पासून महारॅलीची सुरुवात ढोल ताशा व डी.जे. च्या तालात मुख्य रस्त्याने निघाली असून मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.बाजार पेठेतुन रॅली श्रीहरी बालाजी मंदिर येथे आली किर्तीकुमार भांगडीया यांनी श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी रॅलीत कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved