तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडीया यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर येथे हजारो नागरिकांच्या (समर्थकांच्या) उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. 22 ऑक्टोंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या पहिल्याच यादीत चिमूरचे आमदार बंटी भांगडीया 2014 पासून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. 2024 सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीकरिता त्यांनी आज दिनांक 24 ऑक्टोंबरला चिमूर क्रांती नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेत नेहरू विद्यालय चिमूरच्या पटांगनातून बैलबंडी वर रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर येथे माजी खासदार अशोक नेते. भाजपा नेते. वसंत वारजूकर. डॉ श्याम हटवादे. राजू दैवतले. राजू झाडे. नीलम राचलवार. मनीष तुंपल्लीवार. माया ननावरे यांचे उपस्थित नामांकन दाखल केले.
ज्वाला समाचार सच का सामना