Breaking News

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागणीला यश – पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृती मंजूर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील पात्र ७५ विद्यार्थ्यांना २०२४/२५ या वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय २६/९/२०२४ ला राज्य सरकारने जारी केला आहे, या करीता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन व निवेदन देऊन हा विषय लक्षात आणून दिली व आग्रही मागणी केली होती, त्यांनी सदर विषयाकरीता तातडीची बैठक घेऊन पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, या नंतर तीन दिवसातच तत्परता दाखवून शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली.राज्यातील इतर मागास वर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यासाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना या पुर्वी योजना लागू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ३० ऑक्टोबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांची संख्या ७५ इतकी कऱण्यात आली आहे.

सन २०२४/२५ या वर्षांकरीता परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजने अंतर्गत यापूर्वी अर्ज मागविण्यात आले होते. या सर्व अर्जाची इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक यांचे अध्यक्षतेखाली गठीत समितीने छाननी करून, अर्जातील त्रुटींची पूर्तता करून अभ्यासक्रमानिहाय गुणवत्ता यादी तयार केली आहे,महाराष्ट्र शासनाचे विध्यार्थी हिताचा निर्णय घेतल्यामुळे व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने सदैव कसोशीने प्रयत्न करणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे साहेब व महासचिव सचिन राजूरकर यांचे सुध्दा अभिनंदन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने, श्याम लेडे, सौ भावना बावनकर, मनिषा बोबडे, बालू सातपुते,मीनाक्षी बंडे,,रजनी मोरे, सुरेखा वांढरे, स्मिता अवचट,देवराव दिवसे, प्रदीप पावडे, नारायण श्रीरामे, राजेंद्र मुंगले,राजू हिवंज, अशोक टिपले, सुनिल बुरीले, कालिदास येरगुडे,रामदास कामडी, कवडू लोहकरे, दत्तृ भुसारी, राजू ढवस, राजू कुरेकार, भानुदास राऊत,दिपक भोयर, मारोती मशारकर, चंपत डंभारे, अनिल काळे,अशोक सोनटक्के, माधव डुकरे,यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved