Breaking News

चिमूर विधानसभा क्षेत्रातील समस्त शेतकरी बांधवांच्या विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा

हजारो शेतकरी बांधवांना मिळणार पिक विमा योजनेचा लाभ – आमदार बंटीभाऊ भांगडीया

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्रातील हजारो शेतकरी बांधवांचे पिक विमा, अतिवृष्टी तसेच धान, सोयाबीन, कापूस या पिकांवर आलेली किड व रोगांमुळे झालेले शेतीचे नुकसान व अन्य प्रश्नांवर उपाययोजना व मदत करण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रश्न मांडताना आमदार बंटी भांगडीया यांनी चर्चेदरम्यान सांगितले चिमूर विधानसभा क्षेत्रातील हजारो नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना पिक विमा कंपनीने जी नुकसान भरपाई दिली. नुकसान भरपाई वितरित करण्यात आल्यानंतर काही शेतकरी बांधवांच्या खात्यात पिक विम्याची योग्य रक्कम जमा झालेली नाही तसेच, उर्वरित शेतकरी बांधवांना दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या खात्यात योग्य रक्कम जमा करून पिक विम्याचा लाभ देण्यात यावा. पिक विमा वितरित करताना संबंधित पिक विमा कंपनीकडून चिमूर विधानसभा क्षेत्रातील सुमारे ९००० हजार शेतकरी बांधवांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांना पात्र करून पिक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा. जिल्ह्यातील ओरिएंटल इंशुरन्स कंपनी प्रशासन पिक विमा लाभार्थी शेतकऱ्यांना सहकार्य करीत नसून पिक विमा संदर्भातील माहिती पुरविण्यासाठीची त्यांची यंत्रणा ठप्प आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित प्रशासन व विमा कंपनीशी संपर्क साधून पिक विम्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात येईल. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी व पंचनामे पूर्ण झालेले असून त्यासंदर्भातील संपूर्ण अहवाल पुढील सकारात्मक कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न निकाली काढण्यासाठी व त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी दि. ५ ऑगस्ट २०२४ ला बैठक बोलावून संबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी व यंत्रणेला तातडीने सकारात्मक कार्यवाही तथा अंबलबजावणीसाठी आदेश देण्यात येईल अशी अधिकृतपणे माहिती यावेळी दिली.

यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ देवतळे, भाजपा चिमूर तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे व भाजपा किसान मोर्चा चिमूर विधानसभा संयोजक एकनाथ थुटे आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved