पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानभरपाई करीता दिल्या सूचना
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- हिवरा येथील विद्यार्थ्यांनी चिमूर येथे येऊन भाजपच्या पदाधिकाऱ्या सह एसटी डेपोचे आगार प्रमुख यांची भेट घेऊन आमदार महोदय यांना होत असलेल्या अडचणी बाबत अवगत केले होते. कालच आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी चंद्रपूर येथील एसटी विभागाच्या टीसी सोबत चर्चा करून लवकरात लवकर सर्वे करून बस सुरु करण्याचे निर्देश दिले होते.

जो पर्यन्त बस सुरु होत नाही तो पर्यन्त विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी स्वखर्चाने वाहन उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते त्या नुसार आज हिवरा येथे आमदार महोदय यांनी दोन वाहन पाठवले असून आज पासून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने हिवरा येथील सर्व विद्यार्थी व पालकांनी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे आभार व्यक्त केले आहे.
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष केली पाहणी
नागभीड :- अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान व पडझड झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून देण्याच्या प्रशासनाला सूचना आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी नागभीड तालुक्यातील सावर्ला, सावरगाव, चिखलगाव, गिरगाव व कन्हाळगाव येथील परिसरात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून पूरपरिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

अतिवृष्टीमुळे परिसरातील शेतीचा बहुतांश भाग पाण्याखाली गेलेला असून रोपे व पिकांची नासाडी झालेली आहे. तसेच, नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरांचे, शेतीची अवजारे, जनावरे व जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले असून आमदार भांगडीया यांनी शेतीचे झालेले नुकसान व पडझड झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई/आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.
ज्वाला समाचार सच का सामना