Breaking News

शुभमहालक्ष्मी इंटरप्राईजेस साकोली वरती कार्डधारकांचा हल्लाबोल

कार्ड धारकांची ड्रॉ मध्ये लागलेले सामान त्वरीत देण्याची केली मागणी

मॅनेजर टेंभूर्णे यांच्याकडे दिले निवेदन

जिल्हा प्रतिनीधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

( भंडारा) :- शुभमहालक्ष्मी एंटरप्राइजेस विक्री संवर्धन आणि ग्राहक उपाहार योजना अंतर्गत लकी ड्रॉ ची सुरुवात फेब्रुवारी 2023 पासून करण्यात आलेली होती. अंतिम सोडत मार्च 2024 ला झाली असून चार महिने लोटूनही कार्ड धारकांना त्यांना लागलेल्या ड्रॉ च्या वस्तू न मिळाल्यामुळे दिनांक 11 जुलै 2024 रोजी कार्ड धारकांनी ड्रॉ च्या वस्तू मिळविण्यासाठी शुभमहालक्ष्मी इंटरप्राईजेस साकोली वर हल्लाबोल केला.

सविस्तर वृत्त असे की, शुभ महालक्ष्मी इंटरप्राईजेस साकोलीचे डायरेक्टर महेंद्र ठाकरे यांनी लकी ड्रॉ ची सुरुवात करून गोरगरिबांना कमी पैशात मोठ्या वस्तू लागाव्या या उद्देशाने या ड्रॉ ची सुरुवात केली आहे परंतु 12 महिन्याचा ड्रॉ संपुन चार महिने लोटून न ही लकी ड्रॉ च्या कार्ड धारकांना ड्रॉ मध्ये लागलेल्या वस्तू न मिळाल्यामुळे आज दिनांक 11 जुलै 2024 ला शुभम महालक्ष्मी इंटरप्राईजेस साकोलीच्या कार्यालयात कार्ड धारकांचे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

आम्हाला लागलेल्या वस्तू त्वरित उपलब्ध करून द्या अशा आशयाचे पत्र डायरेक्टर महेन्द्र ठाकरे त्यांचे नावे या शुभमहालक्ष्मी इंटरप्राईजेस चे मॅनेजर आनंद पाल टेंभूर्णे यांच्यातर्फे निवेदन देऊन विनंती करण्यात आलेली आहे. यात निवेदन देणारे कार्ड धारक चेतन बोरकर, सुमेध बरसागडे, रोशन फुले, सुधीर फुंडे ,हेमंत भोसकर, विठ्ठल पडोळे, अनिरुद्ध शेंडे, अमित चांदेवार, डॉक्टर सचिन झंजाळ, विनोद चुटे, राहुल राऊत, स्वाती राऊत ,सुशील पिलारे, सुशील गोंधळे ,रोशन भंडारकर, किशन सूर्गोनिवर, प्रवीण नागदिवे, प्रेम सागर मेश्राम, पवन भोसकर इत्यादी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved