जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात आज दिनांक 06/07/20424 रोजी शुल्लक कारणावरून बाप लेकाने घरा शेजारच्याची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्का दायक घटना हळदी येथे सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. राजु शेषराव बोदलकर वय वर्षे 30 राहणार हळदी असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरा शेजारी असलेल्या झाडाच्या फांद्या तोडून झाल्यावर नंतर लागुनच असलेला केबल बाजूला कर असे राजू बोदलकर यांनी सांगितले मात्र सूरज गुरुदास पिपरे वय वर्षे 21 व गुरुदास पिपरे वय वर्षे 48 – या बाप-लेकानी बोदलकर यांच्याशी वाद घातला. वादाचे रुपांतर मारहाणीत होत बाप लेकानी बोदलकर यांच्यावर हल्ला करीत कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमलेली होती. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत आरोपी बाप लेकास अटक करण्यात आली आहे. आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
घटनेने मृतकाच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे.
ज्वाला समाचार सच का सामना